लग्नाच्या पैशातून ‘गरिबांना’ जेवण देणाऱ्या ‘रिक्षा चालका’च्या मदतीसाठी उंचावले अनेक हात, आतापर्यंत मिळाली 6 लाखांची ‘मदत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात आपल्या लग्नासाठी जमा केलेल्या पैशातून प्रवासी मजुरांची खाण्यापिण्याची सोय करणाऱ्या एका रिक्षाचालकास देशभरातून प्रचंड मदत येत आहे. पण, 30 वर्षीय रिक्षाचालक अक्षय कोठावले हे पैसे गरजू आणि गरीबांना खायला घालण्यासाठी आणि रेशन किट देण्यासाठी खर्च करीत आहे. कोठावले म्हणाला की, त्याला मिळालेल्या अपार सहकार्याबद्दल तो कृतज्ञ आहे आणि पुण्यातील रस्त्यावर गरजूंना मदत करत राहण्याचे अजून प्रोत्साहन त्याला प्राप्त झाले आहे. त्याने लग्नासाठी दोन लाख रुपयांची बचत केली होती. 25 मे रोजी त्याचे लग्न होणार होते परंतु कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरु झाले आणि त्याचे लग्न पुढे ढकलले गेले.

तो म्हणाला की, गरीब, विशेषत: स्थलांतरित कामगारांना कुठलेही काम न मिळाल्याने त्यांची मिळकत थांबली आहे, या कारणामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यामुळे त्याला खूप दु:ख झाले. अशा परिस्थितीत आपल्याकडे असलेल्या पैशातून त्याने आपल्या काही मित्रांसह स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघर स्थापित केले आणि इथल्या बर्‍याच ठिकाणी त्याने गरिबांना आणि प्रवासी मजुरांना जेवण दिले. दरम्यान, गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. परंतु ही शोकांतिकादेखील त्याला रोखू शकली नाही आणि त्याने आपले काम चालूच ठेवले.

कोठावले याचे हे काम पाहून देशभरातून बऱ्याच लोकांनी त्याला पैशांची मदत केली. तो म्हणाला, ‘मला देशभरातील लोकांकडून सहा लाख रुपये मिळाले आहेत. याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.’ तो म्हणाला की, ‘आम्हाला मिळालेल्या पैशातून आम्ही बर्‍याच भागात अन्न वाटप करीत आहोत. आमच्या हातात आलेल्या पैशातून आम्ही किराणा सामान विकत घेतले आणि बाजारातून तयार अन्न विकत घेतले. आम्ही गरजूंमध्ये रेशनकिट वाटप करण्याचा विचार देखील करीत आहोत.’ अक्षय कोठावले जेवण वितरणाशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना त्याच्या ऑटोरिक्षामधून डॉक्टरांपर्यंत कुठलेही भाडे न घेता पोहोचवतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like