कॉल डिटेल्समधून मोठा खुलासा : सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी सॅम्युअल आणि रिया यांच्यात 20 मिनिटे झाला ‘संवाद’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह राजपूतशी संबंधित अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यात 20 मिनिटे संवाद झाला होता. 14 जून ला ते एकमेकांशी बोलले होते. त्यानंतरही ते फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते. या नव्या खुलशानंतर हा प्रश्न उभा राहिला आहे की या दोघांमध्ये काय संवाद झाला होता. याआधी देखील समजलं होतं की सॅम्युअल रियासाठी खूप ‘स्पेशल’ होता, त्याने सुशांतच्या खात्यातून पैसेही काढले होते. या खुलशानंतर आता सॅम्युअल देखील वादाच्या भोवऱ्यात अडकणार कि काय अशी शंका आहे. व्हाट्सआप वर देखील या दोघांचं अनेक वेळा बोलणं झालं होतं. त्यामुळे त्याचीही चौकशी होऊ शकते. दिशा संबंधित अनेक अफवा सध्या पसरवल्या जात आहेत त्यामुळे तिचा पती सतीश सालीयनने मुंबईच्या मालवणी पोलीस स्टेशनमध्ये खटला दाखल केला आहे. त्याने तीन जणांविरुद्ध हा खटला दाखल केला आहे आणि त्यांच्या विरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

सुशांतच्या घरी दोन रुग्णवाहिका का ?
सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी दोन दोन रुग्णवाहिका का आल्या ? या गोष्टीवरून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच्या घरी दोन रुग्णवाहिका मागवण्यामागे नेमका काय हेतू होता ? जस्टीस फॉर सुशांत चे प्रभारी विशाल सिंह राजपूत म्हणाले, “ही खूप जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे, सीबीआय च्या चौकशीनंतर सत्य समोर येईलच. जोपर्यंत सुशांतला न्याय नाही मिळणार तोपर्यंत ही मोहीम चालूच राहील.”