लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकला पती, बाळांतपणात बाळ-बाळांतीणीचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांचा गोंधळ

महराजगंज : वृत्तसंस्था – महराजगंजच्या नौतनवा येथील एका खासगी रूग्णालयात मंगळवारी बाळ-बाळांतीणीचा मृत्यू झाला. प्रथम बाळाचा मृत्यू झाला आणि एक तासानंतर मातेने सुद्धा अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रूणालयात जोरदार गोंधळ घातला. आरोग्य विभागाने हे प्रकरण गांभिर्याने घेऊन प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सोनौली तालुक्यातील हनुमानगढिया टोला कोनघुसरी या गावातील राहिवाशी असलेल्या अनिल विश्वकर्माची 28 वर्षीय पत्नी उर्मिला हिला मंगळवारी सकाळी बाळांतकळा सुरू झाल्या. कुटुंबियांनी तिला 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्सने रतनपुर सीएचसी येथे घेऊन गेले, जेथे डॉक्टरांनी बाळांतीणीची प्रकृती नाजुक असल्याचे सांगत तातडीने दुसर्‍या रूग्णालयात हलवण्यास सांगितले. कुटुंबिय महिलेला नौतनवाच्या एका खासगी रूग्णालयात घेऊन गेले. थोड्या वेळानंतर बाळाचा जन्म झाला, परंतु ते मृत पावलेले होते.

नॉर्मल डिलिव्हरीच्या एक तासानंतर बाळांतीणीचाही मृत्यू झाला. बाळ आणि बाळांतीणीचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रूग्णालयात जोरदार गोंधळ घातला. एसीएमओ डॉ. आय. ए. अन्सारी यांना फोनवरून संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देऊन कारवाईची मागणी करण्यात आली.

लॉकडाऊनमध्ये पुण्यात अडकला पती
मृत उर्मिलाचा पती अनिल विश्वकर्मा लाकडाऊनमध्ये पुण्यात अडकला आहे. उर्मिलाच्या दोन मुलींचा जन्म नॉर्मल झाला होता. मोठी मुलगी नेहा (5) आणि छोटी मुलगी सुनेहा (2) अशा तिला दोन मुली आहेत.

कुटुंबियांनी फोनवरूनच तक्रार केली. ज्याचा बेजबाबदारपणा समोर येईल त्याच्यावर विभागीय कारवाई होणार आहे. गरोदर महिलेला बाळांतकळा सुरू असताना दुसर्‍या रूग्णालयात का हलवण्यात आले याचीही चौकशी करण्यात येणार आहे.