BirthdaySpecial : 18 व्या वर्षीच आई बनली होती ‘ही’ अभिनेत्री, प्रेग्नंट असताना झाला अपघात आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री आणि भाजपाच्या नेता मौसमी चॅटर्जी आज आपला 71 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मौसमी चॅटर्जी 60-70 दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. केवळ हिंदी सिनेमातच नाही तर बंगाली सिनेमांमध्येही मौसमी यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. मौसमी चॅटर्जी यांचा जन्म 26 एप्रिल 1948 रोजी कोलकाता येथे झाला आहे. खूप कमी वयातच त्यांनी कामाला सुरुवात केली होती तसेच कमी वयातच लग्नही केलं होतं. मौसमी लग्नानंतर बॉलिवूडमधील लिड अ‍ॅक्ट्रेस म्हणून नावारूपाला आल्या आणि त्यांनी हे भ्रम तोडला की लग्नानंतर महिला या सिनेमात अभिनेत्री म्हणून यशस्वी होत नाहीत. आज वाढदिवसानिमित्त मौसमी चॅटर्जी यांच्या काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

View this post on Instagram

Hie Good Afternoon…. 🎤🎧🎼🎵🎶🔊🎸🎷 😘This movie is purposeful – a lighthouse for me personally. The story line is simple and effective. Excellent acting by the cast. Excellent music, "Rimjhim Ghire Sawan …" stays apart. This is a refreshing movie.😍 The song which glorifies the rain will make you want to take a stroll on the wet lanes and corners of Mumbai. The famous Marine Drive and other landmarks of the city make this a typical Mumbai number. It sees Amitabh Bachchan and Moushumi Chatterjee walking on the water-clogged streets amidst a heavy downpour.🤗 🌺🌱🌲🌳🌴🍃🌾🌿☘🍀 Movie : Manzil (1979) Song : Rim jim gire sawan… Lyricist : Yogesh Singer : lata Mangeshkar Music Director : Rahul Dev Burman 🍂🍃🌾🌿☘🍀🍁🌴🌼 #AmitabhBachchan #MoushumiChatterjee #R.D.Burman #K.K.Mahajan #Vintagebollywoodsongs #Romanticsongs #Evergreensongs #Classicsongs #Indiancinema #Indiansingers #Bollywoodsongs #Oldhindisongs #Oldbollywoodsong #Retrosongs #OldSongs #Retrobollywoodsongs #oldbollywoodlegends #oldbollywoodsong #oldisgold #bollywoodclassics #oldbollywoodfilms

A post shared by Chale The Sath Milke 💖💕 (@old_bollywood_songs) on

मौसमी यांचं खरं नाव इंदिरा, लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण

मौसमी यांचं खरं नाव इंदिरा चॅटर्जी असे आहे. बंगाली सिनेमाचे दिग्दर्शक तरुण मुजुमदार यांनी त्यांच नाव बदलून मौसमी ठेवलं होतं. जेवढ्या कमी वयात मौसमी सिनेमात आल्या तेवढ्याच कमी वयात त्यांनी संसार थाटला होता. वयाच्या 16 व्या वर्षातील मौसमी यांचा पहिला बंगाली सिनेमा बालिका वधू सुपरहिट ठरली होती. त्यानंतर त्यांनी पहिला हिंदी सिनेमा 1972 मध्ये केला. अनुराग असं त्या सिनेमाचं नाव आहे. खूपच कमी वयात मौसमी यांनी जयंत मुखर्जी या निर्मात्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर त्या 18 व्या वर्षी लगेचच आई बनल्या होत्या. त्यांना मेघा आणि पायल नावाच्या दोन मुली आहेत. मौसमी यांनी लग्नानंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं.

View this post on Instagram

Happy Birthday Moushumi Chatterjee 🎊🎉🎁💐❤

A post shared by Moushumi Chatterjee (@moushumi_chatterjee_) on

मौसमी प्रेग्नंट असताना सिनेमाच्या शुटींगवेळी झाला होता असा अपघात

एका मुलाखतीत बोलताना मौसमी यांनी एका सिनेमाच्या शुटींगची एक आठवण सांगितली. यावेळी त्यांना एक अपघाताचा सामना करावा लागला होता तो किस्साही त्यांनी शेअर केला होता त्यावेळी त्या खूप घाबरल्याही होत्या. मौसमी म्हणाल्या की, “1974 मध्ये आलेल्या रोटी कपडा और मकान या सिनेमात मीदेखील होते. रेप सर्व्हाईवर तुलसीची भूमिका मी साकारली होती. या सिनेमाच्या शुटींग दरम्यान एका सीनला माझ्या अंगावर खूप सारं पीठ पडलं होतं. यानंतर स्वत:ची अवस्था पाहून मी रडू लागले. त्यावेळी प्रेग्नंट होते आणि मी खाली पडल्याने ब्लिडींगही झाली होती. त्यानंतर मला लगेचच रुग्णालयात हलवण्यात आलं. मी खूप नशीबवान होते की, मी माझ्या बाळाला गमवलं नाही.” असं मौसमी म्हणाल्या.

मौसमी यांच्या वर्कफ्रंटबद्दल काही…

मौसमी चॅटर्जी यांनी संजीव कुमार, जीतेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, अमिताभ बच्चन अशा अनेक दिग्गजांसोबत काम केलं आहे. त्यांची जोडी जास्त करून विनोद मेहरा यांच्यासोबत जास्त पसंत केली गेली. त्यांचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. त्यात कच्चे धागे, जहरीला इंसान, संतान, जल्लाद, करीब, जिंदगी रॉक्स, नरक, फूल खिले है गुलशन गुलशन, मांग भरो सजना, ज्योति बने ज्वाला, दासी, अंगूर, घर एक मंदिर, घायल या सिनेमांचा समावेश आहे. मौसमी यांनी आवाज, घायल, ना तुम जानो न हम, पीकू आणि आ अब लौट या सिनेमांतही काम केले आहे. या सिनेमांमध्ये त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले गेले आहे.

View this post on Instagram

#happybirthday #moushumichatterjee

A post shared by Moushumi Chatterjee (@moushumi_chatterjee_) on

You might also like