धोनीचा उत्तराधिकारी बनू शकतो ‘हा’ युवा फलंदाज (Video)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. या विंडीज दौऱ्यात भारतीय संघ ३ ते १४ ऑगस्ट दरम्यान वेस्टइंडीजमध्ये ३ टी -२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे.त्याचबरोबर अँटिग्वा आणि जमैका मध्ये दोन कसोटी सामने देखील खेळणार आहे. तीनही प्रकारांमध्ये निवड समितीने रिषभ पंत याची यष्टीरक्षक म्हणून निवड केली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती पंतला या स्थानासाठी तयार करत आहेत. त्याचबरोबर तो या स्थानासाठी योग्य आहे कि नाही याची देखील चाचणी करत आहेत. काल भारतीय संघाच्या निवडीवेळी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दुसऱ्या एका यष्टीरक्षक फलंदाजाचे देखील नाव घेतले.

एमएसके प्रसाद यांनी याच्याविषयी बोलताना म्हटले कि,हा युवा फलंदाज भारतीय कसोटी संघात खेळण्यासाठी पूर्ण तयारीत आहे . त्याचबरोबर निवडीसाठी देखील त्याचा प्राधान्याने विचार केला गेला होता. मात्र या दौऱ्यात वृद्धिमान सहा याची या स्थानासाठी निवड करण्यात आली आहे. सहाणे आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध खेळला होता. त्याचबरोबर सहाच्या सोबतीला रिषभ पंत याची देखील निवड करण्यात आली आहे.

केएल भारत असे या खेळाडूचे नाव असून त्याने भारत अ कडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर बोलताना प्रसाद म्हणाले कि, जर वरिष्ठ खेळाडू दुखापतीतून बाहेर आला तर आम्ही त्याचा प्राधान्याने विचार करतो. त्याचबरोबर केएल भारत हा कसोटो सामन्यांत लवकरच पदार्पण करेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.

भारताकडून शानदार प्रदर्शन
केएल भारत याने भारतीय अ संघाकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले आहे. त्याने या संघाकडून खेळताना ३ शतके देखील केली आहेत त्याचबरोबर यष्टिरक्षण करताना ५० खेळाडूंना देखील बाद केले आहे. भारत अ कडून खेळलेल्या ११ सामन्यांत आंध्रप्रदेशच्या या खेळाडूने ६८६ धावा केल्या असून यात तीन शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध १०६, इंग्लंड लायन्स विरुद्ध १४२ तर श्रीलंका अ विरुद्ध शानदार ११७ धावांची खेळी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –