आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांना कोर्टाकडून समन्स, गंगूबाई काठियावाडी यांच्या मुलाचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अभिनेत्री आलिया भट्टचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट चर्चेत आला होता आणि आता आलिया भट्ट तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि लेखक यांना माझगाव कोर्टातून समन्स बजावण्यात आला आहे.

वास्तविक, याचिकाकर्ते बाबूरावजी शाह (गंगूबाई काठियावाडी यांचा मुलगा) म्हणतात की, ‘गंगूबाई काठियावाडी’मुळे त्यांचे कुटुंब बदनाम होत आहे. यासोबतच बऱ्याच गोष्टी चित्रपटामध्ये चुकीच्या असल्याचेही म्हटले आहे. अशा परिस्थितीत माजगाव कोर्टाने आलिया, भन्साळी तसेच चित्रपटाच्या लेखकाला समन्स बजावले आहे. या सर्वांना 21 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

शहराची प्रतिमा होईल खराब

याआधी महाराष्ट्र कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. हा चित्रपट कामठीपुराचा खरा इतिहास खराब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अमीन म्हणतात. यामुळे कामठीपुरा येथील जनतेच्या भावना दुखावल्या जातील आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ते हानिकारक आहे.

हा चित्रपट 30 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाविषयी वाद होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ‘पद्मावत’ चित्रपटाविषयी देखील बराच गोंधळ उडाला होता. एकीकडे जेव्हा संजयवर हल्ला झाला तेव्हा करणी सेनेने त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले. चित्रपटाचे नावदेखील बदलण्यात आले, अखेरीस सर्व काही थंड झाले आणि कोणालाही चित्रपटाविषयी आक्षेप राहिला नाही.

कोण होती गंगूबाई?

लेखिका एस हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकानुसार गंगूबाई गुजरातमधील काठियावाड़ येथील रहिवासी होती, म्हणूनच तिला गंगूबाई काठियावाडी म्हटले जाते. गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. गंगूबाईंला बालपणात अभिनेत्री व्हायचं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी गंगूबाई वडिलांच्या अकाउंटंटच्या प्रेमात पडली आणि लग्नानंतर ती मुंबईत पळून गेली. मात्र तिच्या नवऱ्याने फसवणूक करून फक्त 500 रुपयात तिला कोठ्यावर विकले.

पतीच्या सौदेबाजीमुळे गंगूबाई लहान वयातच वेश्याव्यवसायात अडकली आणि नंतर अनेक कुख्यात गुन्हेगार गंगूबाईचे ग्राहक बनले. या पुस्तकात असे म्हटले आहे की लालाच्या टोळीच्या सदस्याने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर गांगुबाईंनी न्यायाची मागणी करण्यासाठी करीम लालाची भेट घेतली आणि त्याला राखी बांधून आपला भाऊ बनविले. करीम लालाची बहीण असल्याने कामठीपुराची कमान लवकरच गंगूबाईंच्या हाती आली. असे म्हणतात की गंगूबाईंनी कोणतीही मुलगी तिच्या संमतीशिवाय तिच्या खोलीत ठेवली नाही. गंगूबाईंंने लैंगिक कामगार आणि अनाथ मुलांना मदत करण्यासाठी बरेच काम केले होते.