भारत-चीन तणावावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘1962 लक्षात ठेवावं, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण योग्य नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत-चीन तणावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) चे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करू नये. गलवान खोर्‍यातील भारत-चीन सीमा वादावरून काँग्रेस केंद्रावर लागोपाठ हल्ला करत आहे. पवार यांचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींबाबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या आक्रमकतेपुढे सरेंडर केले आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस पार्टी गलवान खोर्‍यात 15 जूनला भारत आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीवरून लागोपाठ केंद्रावर निशाणा साधत आहे. काँग्रेस पार्टीने म्हटले आहे की, चीनसोबत वादावरून पंतप्रधानांनी समोर आले पाहिजे आणि जनतेला सत्य सांगितले पाहिजे. तर, शरद पवार यांनी म्हटले की, 1962 च्या युद्धात पहिल्यांदा असे झाले, जेव्हा शेजारी राष्ट्राने भारताच्या मोठ्या भूभागावर दावा केला होता.

माजी संरक्षण मंत्री पवार यांनी सातारा येथे मीडियाशी बोलताना म्हटले की, आपण हे विसरू शकत नाही की, 1962 मध्ये काय झाले होते, जेव्हा चीनने भारताच्या 45,000 वर्ग किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला होता. ही आरोप करण्याची वेळ नाही. काहींनी हेदेखील पाहिले पाहिजे की, यापूर्वी काय घडले आहे. हा राष्ट्रीय हिताचा मुद्दा आहे आणि यावर राजकारण करू नये. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि काँग्रेसचे आघाडी सरकार आहे. भारत-चीन सीमा वाद 3,488 किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (एलएसी) कवर करतो. पवार म्हणाले, गालवान खोर्‍यातील वादाला केंद्राला दोषी ठरवता येणार नाही.

त्यांनी म्हटले की, जेव्हा त्यांनी भारतीय जमीनीवर अतिक्रण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या सैनिकांनी चीनी सैनिकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. यासाठी सरकार किंवा संरक्षण मंत्र्यांचे अपयश आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. जर आपले सैन्य अलर्ट नसते तर आपल्याला चीनच्या दाव्याबाबत समजले नसते. ते म्हणाले की, हाणामारीचा अर्थ हा आहे की, आपण सतर्क होतो अन्यथा आपण पकडले गेलो असतो. यासाठी मला वाटत नाही की, असे आरोप करणे योग्य आहे.