आदित्य नारायणसोबत लग्नाबद्दल ‘सिंगर’ नेहा कक्करनं सोडलं ‘मौन’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडल 11 ची जज नेहा कक्कर आणि अँकर आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. इंडियन आयडलच्या सेटवर दोघांचं लग्नही झालं. परंतु चाहत्यांना हेच कळत नव्हतं की, हे खरं आहे की, खोटं लग्न आहे. आदित्य नारायण आणि त्याचे वडिल सिंगर उदित नारायण यांनी यावर भाष्य केलं होतं. आता चाहत्यांना प्रतिक्षा होती ती म्हणजे नेहा कक्करच्या प्रतिक्रियेची. नेहानंही या मुद्द्यावरून मौन सोडलं आहे आणि चाहत्यांचं कन्फ्युजन दूर केलं आहे.

इंस्टाग्रामवरून नेहाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, नेहाचं लग्न ? खरं तर हा व्हिडीओ नेहाच्या डिनरनंतरचा होता. नेहा आपल्या भावासोबत आणि मित्रासोबत डिनरला आली होती. नेहानं या व्हिडीओवर कमेंट करत सिंगल असल्याचं स्पष्ट केलं आहे. नेहा म्हणाली की, “लग्न वगैरे काही नाही. मी सिंगल आहे.”

View this post on Instagram

#nehakishaadi ???

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नेहा पुढे म्हणाली आहे की, “मी सिंगल आहे. आदि(आदित्य नारायण) नेहमीच स्क्रीनवर मला लग्नाबद्दल विचारायचा आणि मी नेहमीच त्याला नकार द्यायचे. बाकी जे काही झालं ते सगळं मनोरंजन म्हणून करण्यात आलं होतं. मी लोकांचं मनोरंजन करते आणि त्यांना आनंदी ठेवते, माझं म्युझिक लोकांना आवडतं याचा मला आनंद आहे.”

काय म्हणाला होता आदित्य नारायण ?
नेहासोबतच्या लग्नाबद्दल बोलताना आदित्य नारायण म्हणाला होता की, “लग्न हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामळे मी जेव्हा लग्न करेन तेव्हा त्याची घोषणा मी स्वत:च करेन. मी माझ्या लग्नाची बातमी कधीच कोणापासून लवपणार नाही. नेहाच्या आणि माझ्या लग्नाची गोष्ट ही मस्करीत सुरू झाली होती. ही गंमतीनं चालणारी गोष्ट लोकांनी गंभीरतेनं घेतली. खरं तर हे शोचा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला एक भाग होता.”

 

You might also like