PVC Aadhaarcard : ‘या’ पध्दतीनं एकाच मोबाइलवरून संपुर्ण कुटूंबाचं बनवा नवीन आधार पीव्हीसी कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्याच्या नियमांच्या अंतर्गत आधार कार्डमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवण्याची व्यवस्था आहे. परंतु, यूआयडीएआयने आता विना-रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर सुद्धा ओटीपीची सुविधा दिली आहे. अशावेळी कुटुंबातील कुणीही सदस्य अन्य सदस्यांच्या पीव्हीसी कार्डसाठी ऑर्डर देऊ शकतो. मात्र, दोन्ही पर्याय उपलब्ध राहतील. विना-रिजस्टर्ड नंबरवर आधारचा प्रिव्ह्यू पहाण्याची सुविधा मिळणार नाही. तर रजिस्टर्ड मोबाइलवर ही सुविधा आहे.

डेबिट-क्रेडिट कार्डप्रमाणे आहे नवीन आधार

आधार पीव्हीसी कार्ड टिकाऊ आहे, दिसण्यास आकर्षक आहे. या नव्या पीव्हीसी आधार कार्डच्या क्यूआर कोडद्वारे कार्डची सत्यता तात्काळ होईल. कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. हे मिळवण्यासाठी 50 रूपये भरावे लागतील. ज्यानंतर हे स्पीड पोस्टद्वारे घरी येईल. डिलिव्हरीसाठी कोणताही चार्ज लागणार नाही. घरबसल्या हे कार्ड कसे मागवायचे ते जाणून घेवूयात…

असे तयार होईल आधार पीव्हीसी कार्ड

1  सर्वप्रथम युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in ओपन करा.

2  त्यानंतर माय आधार सेक्शनमध्ये ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.

3  यावर क्लिक करताच तुम्हाला 12 अंकांचा आधार क्रमांक किंवा 16 आकडी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकांचा ईआयडी नोंदवावा लागेल. या तिनपैकी एक टाकावा लागेल.

4  आधार नंबर टाकल्यानंतर खाली सिक्युरिटी कोड किंवा कॅप्चा कोड टाका.

5  यानंतर खाली सेंड ओटीपीवर क्लि करा. ज्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

6  ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटन क्लिक करा.

7  यानंतर स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची प्रीव्ह्यू कॉपी येईल, ज्यामध्ये डिटेल्स असतील.

8  शेवटी पेमेंट ऑपशन येईल. त्यावर क्लिक करून अनेक डिजिटल माध्यमाने 50 रुपये भरू शकता.

9  15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने कार्ड तुमच्या घरी पोहचेल.