पुलवामा हल्ल्यातील मसूद अझहरच्या पुतण्याच्या निशाण्यावर होता इंटरनॅशनल मीडिया, NIA चा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या आरोप पत्रानुसार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमर फारूक ज्याने 14 फेब्रुवारी 2019 ला झालेला पुलवामा हल्ला घडवून आणला, त्याला बीबीसीच्या पत्रकारांच्या टीमला निशाणा बनवायचे होते. आत्मघातकी हल्लेखोराला त्या पत्रकारांना हल्ला करायचा होता जे आदिल अहमद डारच्या घरी त्याचे वडिल गुलाम हसन डार यांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी गेले होते.

एनआयएने उमर फारूक आणि पाकिस्तान येथील त्याचे काका अम्मार अल्वी यांच्यामध्ये 21 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या चर्चेचा हवाला देत सांगितले की, फारूकला आपल्या काकाकडून खोर्‍यातील बीबीसीच्या पत्रकारांना निशाणा बनवायचे होते. त्याला वाटत होते की, असे केल्याने जैश-ए-मोहम्मद अंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष आकर्षित करेल. मात्र, अजून हे स्पष्ट झालेले नाही की, त्यावेळी पत्रकार खोर्‍यात होते किंवा नाही.

चार्जशीटनुसार, अल्वीने फारूकला पुलवामा हल्ल्याच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी सांगितले आणि पत्रकारांवर हल्ला करण्याची परवानगी नाकारली. चार्जशीटमध्ये त्या बीबीसीच्या पत्रकारांची नावे देण्यात आलेली नाहीत. चार्जशीटमध्ये 46 वर्षीय अल्वीचे नाव पुलवामा हल्ल्याचा प्रमुख हँडलर म्हणून नमूद करण्यात आले आहे. सोबतच फारूक, अजहर, अब्दुल रौफ असगर, आणि 15 अन्य लोकांची नावे सुद्धा यामध्ये आहेत. एनआयएने अल्वीची 2016 ची काही छायाचित्रे शोधली आहेत, ज्यामध्ये तो फारूकसोबत अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतातील एका ट्रेनिंग सेंटरमध्ये दिसत आहे.

चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, उमर फारूक, जो पुलवामा हल्ल्यानंतर सुद्धा काश्मीरमध्ये अडकला होता तो पाकिस्तानद्वारे अझहर आणि अब्दुल रौफ असगरसह 44 संशयित दहशतवाद्यांच्या अटकेनंतर चिंताग्रस्त झाला होता. इंटरनॅशनल प्रेशर पाहता पाकिस्तानने हे पाऊल उचलले होते. प्रकरणाचा तपास करणार्‍या एका अधिकार्‍याने चार्जशीटवर बोलताना म्हटले की, जैश-ए-मोहमम्दचा हँडलर ज्यांच्या संपर्कात फारूक होता, त्यास आयएसआयने सूचना दिली की, हा केवळ एक देखावा आहे, लवकरच त्यांच्या लीडर्सना सोडले जाईल. एनआयएने चार्जशीटमध्ये या चर्चेची एक कॉपी लावली आहे.

एका दुसर्‍या चर्चेत पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा नेता फआरूकने काश्मीरच्या शाकिर बशीरचे कौतूक केले आहे त्याच्यानुसार शाकिरने तिच भूमिका पार पाडली जी 2001 च्या संसद हल्ल्या दरम्यान अफजल गुरुने पार पाडली होती. 24 वर्षांचा शाकिर काकापोरा येथील राहणारा होता आणि तो या प्रकरणात अटक करण्यात आलेला पहिला व्यक्ती होता.

पुलवामा हल्ल्यात वापरलेले 200 किलो आयईडी त्याच्या घरात जमवले होते आणि त्याने सीआरपीएफच्या ताफ्याची टेहाणीसुद्धा केली, स्फोटकांची व्यवस्था केली, कारमध्ये बॉम्ब फिट करण्यात मदत केली आणि आत्मघाती हल्ल्याच्या ठिकाणी पोहचवली होती. एजन्सीला फारूकच्या फोनमधून शेकडो व्हिडिओ क्लिप, व्हॉईस नोट आणि व्हॉट्सअप मॅसेज मिळाले, ज्यामध्ये जैश-ए-मोहमम्द दहशतवादी भारतात पाठवण्यापूर्वी आनंद साजरा करताना, प्रशिक्षण घेताना आणि सराव करताना दिसत आहेत.

काही व्हिडिओ योजना आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित सुद्धा होते. एनआयएच्या आरोप पत्रानुसार, फारूकने एकुण 5.7 लाख पाकिस्तानी रुपये खर्च केले (सुमारे आजच्या दरानुसार 2.51 लाख रुपये), पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके आणि अन्य वस्तूंची व्यवस्था करण्यात, एकुण 10 लाख पाकिस्तानी रुपये त्यांच्या दोन बँक खात्यात पाठवण्यात आले. पाकिस्तानची एलाईड बँक लिमिटेड आणि मीजान बँक, सीमे पलिकडे आहेत. हे स्पष्ट नाही की त्याने पैसे कसे काढले.

एनआयएने मे 2020 चा एक संयुक्त राष्ट्रच रिपोर्टचा हवाला देत म्हटले की, जैश-ए-मोहम्मदचे तालिबान आणि अल-कायदा सोबत घनिष्ठ संबंध आहेत. जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबा (एलईटी) अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी तरूणांच्या तस्करीची सुविधा देतात, जे कामचलाऊ स्फोटक उपकरणांमध्ये (आयईडी) सल्लागार, प्रशिक्षक आणि तज्ज्ञ म्हणून काम करतात. फारूकला सुद्धा 2016-17 मध्ये अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते.

यात म्हटले आहे की, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबाजवळ सुमारे 800 आणि 200 सशस्त्र दहशतवादी होते, जे नंगरहार प्रांताच्या मोहमंद दरगाह, दुर बाबा आणि शेरजाद जिल्ह्यात तालिबान दलांसोबत होते. ते अफगाण तालिबानमध्ये काम करतात. एनआयएचे महासंचालक वाय. सी. मोदी यांनी म्हटली, आमचे चार्जशीट या हल्ल्यातील आरोपींच्या विरोधात एकत्र करण्यात आलेले फुल-प्रूफ डिजिटल, फॉरन्सिक, वृत्तचित्र आणि तोंडी साक्षीवर आधारित आहेत. भारतात दहशतवादी हल्ला घडवणे आणि काश्मीरी तरूणांना भडकवण्यासाठी चार्जशीटने पाकिस्तानातील संस्थांना सहभागी करण्याचे रेकॉर्ड बनवले आहे.