कोरोनातून बरे झालेल्या लोकांना व्हॅक्सीनची आवश्यकता नाही; पीएम मोदींना हेल्थ एक्सपर्ट्स सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पब्लिक हेल्थ एक्सपर्ट्स (Health Experts) च्या एका ग्रुपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोपवलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जे लोक कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांना व्हॅक्सीन देण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सोबतच या गटाने इशारा दिला आहे की मोठ्या प्रमाणावर अंदाधुंद आणि अर्धवट लसीकरण कोरोना व्हायरसचे म्युटेटेड फॉर्म उत्पन्न होण्याचे कारण ठरू शकते.

या गटाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणात लोकांचे लसीकरण करण्याऐवजी केवळ त्याच लोकांचे लसीकरण केले पाहिजे जे संवेदनशील आणि जोखीम श्रेणीत आहेत. या गटात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे डॉक्टर कोविड-19 संबंधी राष्ट्रीय कार्यकारी सदस्य सुद्धा सहभागी आहेत.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमोलॉजिस्ट्स आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
देशात महामारीची सध्याची स्थिती मागणी करते की,
या टप्प्यात सर्व वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याऐवजी महामारी संबंधी आकड्यांशी स्वताला निर्देशित केले पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या रिपोर्टमध्ये अधोरेखित केले आहे की,
कमी वयाचे प्रौढ आणि मुलांचे लसीकरण पुष्टीकरण केलेला पुरावा नाही आणि ते परवडणारे असणार नाही. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की,
अनियोजित लसीकरणाने व्हायरसचे म्युटेटेड फॉर्म तयार होण्यास मदत होऊ शकते.
जे लोक कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांना लसीकरणाची सध्या कोणतीही आवश्यकता नाही.

हे देखील वाचा

सावधान ! ‘या’ 5 गोष्टींपासून आता तरी दूरच राहा, इम्यूनिटीला करतात कमकुवत; जाणून घ्या

11 जून राशीफळ : आज मिथुन राशीत चंद्र, 5 राशींमध्ये आनंद, इतरांसाठी असा आहे शुक्रवार

 

नितिन गडकरींचा भाऊ असल्याचे सांगत 5 लाखांची फसवणूक, पिता-पुत्रास अटक

Surya Grahan 2021 : सूर्य ग्रहणामुळे येत्या 45-90 दिवसात होणार उलथा-पालथ ? ज्योतिषांनी केली मोठ्या संकटाची भविष्यवाणी

Chandrakant Patil | ‘मुंबईत सगळं काही ब्रिटिशांनीच केलं, शिवसेनेनं कुठ काय केलं?’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Police Sub Inspector Transfers | राज्यातील 19 पोलिस उपनिरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

Maratha Reservation | मराठा समाजाच्या आंदोलनाची तारीख ठरली

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  story no need to vaccinate people who had documented covid 19 infection health expert suggests pm modi