Nobel Prize 2019 : नोबेल पुरस्कार 10 डिसेंबरला का दिला जातो, जाणून घ्या

स्वीडन : वृत्तसंस्था – नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. डायनामाइटची निर्मिती करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ साहित्य, शांतता, अर्थशास्त्र ,आरोग्य ,विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जातं. 10 डिसेंबर रोजी 2019 च्या विजेत्यांना नोबेल पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुरस्कारासाठी नाव जाहीर केले जाते परंतु हा पुरस्कार 10 डिसेंबर रोजी देण्यात येतो. कारण 10 डिसेंबर रोजी स्वीडनचे वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी असते म्हणून त्या दिवशी हा पुरस्कार प्रदान केला जातो.

स्वीडनचे रहिवासी असणारे अल्फ्रेड नोबेल रसायनशास्त्रज्ञ आणि इंजिनीअर होते. त्यांनी डायनामाइट नावाच्या प्रसिद्ध स्फोटकांचा शोध लावला. डिसेंबर 1897 मध्ये मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी आपल्या विशाल संपत्तीचा एक मोठा भाग ट्रस्टसाठी राखून ठेवला. ज्यांचे काम मानवजातीसाठी सर्वात कल्याणकारी ठरले आहे त्यांना दरवर्षी या पैशाचे व्याज दिले जावे अशी अल्फ्रेड नोबेलची इच्छा होती. अशाप्रकारे अल्फ्रेड नोबेलच्या इच्छेनुसार हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दरवर्षी दिला जातो.

2019 च्या विविध क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची यादी –

भारतीय वंशाच्या अभिजीत बॅनर्जी यांना सन 2019 साठी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. फ्रान्सच्या एस्थर डफ्लो (अभिजीत बॅनर्जी यांची पत्नी) आणि अमेरिकेचे मायकल क्रेमर यांना संयुक्तपणे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेल्या कामांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना नोबेल शांति पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या देशाचा शत्रू एरिट्रियाशी संघर्ष सोडविण्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. शांती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविण्याच्या प्रयत्नांसाठी आणि विशेषत: शेजारील इरीट्रियाबरोबरच्या सीमा संघर्ष सोडण्याच्या निर्णायक पुढाकारासाठी अबी अहमद अली यांना हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती नोबेल पारितोषिक मंडळाने दिली.

‘द रेमेन्स ऑफ द डे’ या कादंबरीसाठी प्रसिद्ध ब्रिटीश लेखक काझुओ इशिगुरो यांची यंदाच्या साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

कॅनडा-यूएस जेम्स पीबल्स, स्वित्झर्लंडचे मायकल मेयर आणि डिडिएर क्लोझ यांना भौतिकशास्त्रासाठी नोबल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रसायनशास्त्रासाठी अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन गुडनिफ, ब्रिटनचे स्टॅन्ली व्हिटिंगहॅम आणि जपानी शास्त्रज्ञ अकिरा योशिनो यांना देण्यात आले आहे. कॅन्सर थेरपीच्या शोधासाठी अमेरिकेचे शास्त्रज्ञ जेम्स अ‍ॅलिसन आणि जपानचे तसूकू होन्जो यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like