आता Google फोटोजवर नाही मिळणार तुमचे जुने फोटो, जाणून घ्या कारण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगल फोटोजवर आता तुम्हाला जुने सेव्ह फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही. यापूर्वी Google च्या फोटो बॅकअप प्लॅटफॉर्मने आपल्या Android किंवा iOS डिव्हाइसवर सेव्ह केलेले सर्व फोटो स्वयंचलितपणे अपलोड केले होते. यात फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सारख्या अ‍ॅप्सद्वारे तयार केलेल्या फोल्डर्समध्ये संग्रहित केलेले फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट होते.

जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने म्हटले आहे की, त्याने आता हे वैशिष्ट्य बंद केले आहे आणि आता आपणास हे फोटो स्वतः सेव्ह करावे लागतील किंवा या वैशिष्ट्यासाठी तयार केलेल्या विशिष्ट अ‍ॅपकडे जावे लागेल. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोविड -19 मुळे लोक अधिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

तर इंटरनेट संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, मेसेजेस आणि किक सारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे तयार केलेल्या डिव्हाइस फोल्डर्ससाठी बॅकअप आणि संकलनला बंद केले गेले आहे. आपण सेटिंग्जमध्ये हे कधीही बदलू शकता. गुगलने सांगितले की, यापूर्वीच सोशल मीडिया अ‍ॅप्सद्वारे बॅकअप आणि ऑर्गेनाइज्ड झालेला कोणताही फोटो या बदलांमुळे प्रभावित झाला नाही.