चीनी सैनिकांना रेजांगलामध्ये करायची होती गलवानची पुनरावृत्ती, भारतीय ’वाघां’नी ’ड्रॅगन’चा प्लॅन केला ‘फेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिणी पँगोंगमध्ये रेजांगलापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील मुखपरी पर्वतावर चीनी सैनिकांनी सोमवारी सायंकाळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हे रणनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. जर या पर्वतावर चीन लष्काराने कब्जा मिळवला असता तर तो पँगोंग परिसरात भारतीय सैनिकांच्या तैनातीपासून हालचालींवर नजर ठेवू शकला असता, परंतु लष्कराने त्यांचा प्रयत्न अयशस्वी केला.

लष्कराच्या सूत्रांच्या अनुसार सोमवारी सुमारे सहा-सात हजार चीनी सैनिक शस्त्रांसह दंडकू आणि काटेरी हत्यार्‍यांनी सज्ज होते. असे दिसत होते की, गलवान खोर्‍यातील घटनेची त्यांना पुनरावृत्ती त्यांना करायची होती. गलवान खोर्‍यात अशाच प्रकारच्या शस्त्रांच्या हल्ल्यात तब्बल 20 भारतीय जवान शहीद झाले होते, परंतु त्या घटनेनंतर लष्कर प्रत्येक स्थितीसाठी तयार होते. यामुळे चीनी लष्कराचा प्रयत्न अयशस्वी झाला.

भारतीय लष्कराने नुकतेच पँगोंग परिसरात अनेक ठिकाणांवर नव्याने तैनाती केली आहे. रणनितीनुसार महत्वाच्या पर्वतांवर आपली उपस्थिती नोंदवली आहे. असे करणे यासाठी जरूरी होते, कारण चीन लष्कर फिंगर-4 आणि फिंगर-5 च्या पर्वतांवर पाय रोवून होते, तर भारतीय लष्कर खालील भागात होते. मागच्या आठवड्यात भारतीय लष्कराने ब्लॅक टॉपसह अनेक पर्वतांवर आघाडी उघडली होती. यामुळे चीनी लष्कर पोझीशनमध्ये आले. इतकेच नव्हे, भारतीय लष्कराने मुखपरी पर्वतावर सुद्धा आपली उपस्थिती कायम केली. चीनकडून मुखपरी पर्वताचा उल्लेख शेनपाओ माऊंटन म्हणून केला जात आहे.

लेफ्टनन्ट जनरल राजेंद्र सिंह यांच्यानुसार रेंजांगलाच्या परिसरात याच क्षेत्रातील सर्वच पर्वत रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. या पर्वतांवरून दोन्हीकडे लक्ष ठेवता येते. यासाठी ते यावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात होते. हे ते स्थान आहे, ज्यावर कुणाचेही नियंत्रण नाही, परंतु दोन्ही देशांचे लष्कर या क्षेत्रात एकेकाळी गस्त घालत होते. अशाप्रकारे फिंगर परिसरात चीनी लष्कर पाय रोऊन आहे, हे कोणाचेही नियंत्रण नसलेले भाग होते, ज्यावर चीनी लष्कर येऊन बसले.

चीन मागे हटला नाही, तेव्हा बदलली दिशा
सिंह यांनी सांगतले की, अनेक लष्करी चर्चेनंतर सुद्धा चीन पँगोंग परिसरातून मागे हटला नाही, तेव्हा मागच्या आठवड्यात भारतीय लष्कराने आक्रमक होत पँगोंग परिसरात रणनीतीदृष्ट्या महत्वाच्या अनेक पर्वतांवर पोझीशन घेतली. यामुळे भारतीय लष्कराची स्थिती खुपच चांगली झाली होती.

चीनसाठी हो मोठा धडा
सिंह यांनी म्हटले, 7 सप्टेंबरच्या घटनेने हे स्पष्ट होते की, चीन शेनपाओ पर्वतावर कब्जा करण्याच्या बाजूने होता. येथे त्याला भारतीय लष्कराच्या उपस्थितीविषयी माहित नव्हते किंवा त्यास कठोर प्रत्युत्तराची अपेक्षा नव्हती. यासाठी त्यास भारतीय लष्कराकडून धक्का मिळाला. चीनसाठी हा मोठा धडा आहे. रेजांगला तेच स्थान आहे, जेथे 1962 च्या लढाईत भारतीय लष्कराच्या मेजर शैतान सिहं यांच्या तुकडीने चीनी सैनिकांना धडा शिकवला होता.

दोन्ही देशांनी करार केला पाहिजे
सिंह म्हणाले, लष्करी कमांडरसह अनेक चर्चांमध्ये तणाव कमी करण्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. यासाठी राजकीय स्तरावर मुद्दा सोडवण्याची गरज आहे. यासाठी रितसर दोन्ही देशांनी करार केला पाहिजे आणि त्यामध्ये एलएसीवरील स्थिती ठरवली पाहिजे.