परदेशातून आल्यानंतर केली UPSC ची तयारी, ‘कोचिंग’ क्लास शिवाय परीक्षेत टॉप करून ‘ती’ बनली IAS

पोलीसनामा ऑनलाईन टीम – संघ लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी नागरी सेवा परीक्षा ही देशातील अतिशय मानाची, महत्वाची आणि सर्वोच्च परीक्षा समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये मोठ्या पदांवर काम करता येते. सन २०१७ साली संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जयपूरच्या अनुकृती शर्मा यांनी ३५५ व्या रँक ने ही परीक्षा उत्तीर्ण केली. मुळात अनुकृती शर्मा यांना नागरी सेवेमध्ये कधीच यायचे नव्हते. त्या तर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्या होत्या. परंतु त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडत गेल्या ज्यामुळे त्यांनी सर्व सोडून आयएएसच्या परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले. कसल्याही प्रकारचा कोचिंग क्लास न लावता शर्मा या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.

अनुकृती शर्मा यांनी जयपूरच्या इंडो भारत इंटरनॅशनल स्कुल मधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी २०१२ साली इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च, कोलकाता मधून (बीएसएमएस) पदवी प्राप्त केली. त्यानंतर अनुकृती यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील एका विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांनी नागरी सेवा परीक्षेत पदार्पण करण्याचे ठरवले.

हे कारण होते ज्यामुळे अनुकृती यांनी नागरी सेवेत प्रवेश केला
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनुकृती यांनी एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, आमच्या इथे एका भय्याचे चहाचे दुकान आहे. ज्यांची मुलगी केवळ १४ वर्षांची असताना तिचे लग्न केले गेले. त्या वेळेस मला जाणीव झाली की, या मुलीच्या तुलनेत मला खूप साऱ्या सुविधा मिळतात. जे करू इच्छिते ते करू शकते. जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकते. त्यानंतर मला वाटले की, ज्या लोकांना अशा सुविधा मिळत नाहीत त्यांच्यासाठी मी काही तरी केले पाहिजे. असे मला सतत वाटू लागले. त्यानंतर नागरी सेवेची तयारी करण्याची कल्पना सुचली. त्याबाबत मी माझ्या शिक्षकांशीही चर्चा केली.

अनुकृती यांनी दिल्या टिप्स
अनुकृती सांगतात की, हा निर्णय घेताना घरच्यांना सांगणे अतिशय कठीण होते. थोडा वेळ लागला पण सर्वजण तयार झाले. त्याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. आता सर्वजण खुश आहेत. अनुकृती यांचे म्हणणे आहे की, आपल्याला जेव्हा-केव्हा वाटते की, आपण नागरी सेवा परीक्षेची तयारी करावी तेव्हा मुळीच घाबरू नका. अशी अनेक लोक आहे जे की, या परीक्षेच्या तयारी साठी नाेकरी सोडतात. किंवा कॅम्पस प्लेसमेंट सोडून देतात. अशा परिस्थितीत जर यश नाही मिळाले तर हताश होऊ नका. धैर्य बाळगा आणि विचार करा की, मी या ठिकाणी का आहे..? आणि काय करू इच्छितो. हे तुम्हाला खूप प्रेरणा देईल आणि तुम्ही पुन्हा उभे राहाल. कुठलाही क्लास न लावता देशातील सर्वोच्च परीक्षा उत्तीर्ण होणे ही अनुकृती यांची सक्सेस स्टोरी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –