4 मित्रांनी 5 लाखात सुरु केला ‘हा’ बिजनेस, 2 वर्षात 60 कोटींची ‘कमाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत हा बचत करणाऱ्या लोकांचा देश आहे असे म्हणले जाते. भारतात मध्यमवर्गीय लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लोक सध्या अनेक वस्तूंची खरेदी करताना दिसत आहे. भारतात आता ट्रेंड आहे तो फर्निचरचा. हाच ट्रेंड ओळखून लोकेंन्द्र राणावत यांनी वुडन स्ट्रीट सुरु केले. आज फर्निचरच्या वस्तू विकून हा व्यक्ती लखपती झाला आहे. लोकेेंद्र यांनी त्यांच्या को फांऊडर्सला बरोबर घेऊन संशोधन करुन ऑनलाइन कस्टमाइड फर्निचर फर्मची सुरुवात केली.

लोकेंद्र यांचा जन्म राजस्थानच्या उद्यपूरचा आहे. त्यांचे वडील नौदलात होते तर आई गृहिणी होती. लोकेंद्र यांनी इलेक्ट्रनिक कम्युनिकेशन इंजिनिअर केल्यानंतर मार्केटिंगमध्ये एमबीए केले. एका साधारण विद्यार्थी असलेले सातत्य आणि मेहनतीने ते आज आपल्या व्यवसायामुळे लखपती झाले आहेत.

ओळखली बाजारातील मागणी –

शिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्वताचा व्यवसाय सुरु करायचा होता. म्हणून त्यांनी त्यांच्यासारखे विचार आणि आवड असलेल्या भागीदारांचा शोध घेतला. त्यानंतर त्यांनी दिनेश प्रताप सिंह, विरेंद्र राणावत आणि विकास बाहेती यांच्या मदतीने ऑनलाइन कस्टम मेड फर्नीचर स्टोरची सुरुवात केली ज्याचे नाव ठेवण्यात आले वूडन स्ट्रीट.

वूडन स्ट्रीट कंपनीने ग्राहकांना कस्टम मेड फर्निचरबरोबर ग्राहकांच्या पसंतीनुसार फर्निचर बनवून देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. याशिवाय हाय क्वालिटी हार्डवूड फर्निचर देखील ग्राहकांना उपलब्ध करुन दिले. २०१५ सालापासून ५ लाख रुपयांच्या गुंतवणूकीने सुरु केली आणि १८ महिन्यानंतर त्यांना 20 कोटी रुपयांपर्यंत नफा झाला. वूडन स्ट्रीट संपूर्ण देशात ग्राहकांना त्यांना हवे तसे फर्निचर बनवून देतात.

या व्यापारातून त्यांनी आतापर्यंत देशातील १० हजार लोकांना सेवा दिली आहे. फर्निचर बनवण्यापासून ते डिलेवरी करे पर्यंत सर्व काम या कंपनीकडून केले जाते. वूडन स्ट्रीट कडे सध्या २५०० पेक्षा आधिक फर्निचरचे डिझाइन्स उपल्बध आहेत. आता दोन वर्षात या कंपनीने 60 कोटीचा नफा कमावला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like