PM मोदी – शी जिनपिंग बैठक ! ‘हा’ दगड ‘भूकंप’ आणि ‘त्सुनामी’मुळं जागेवरून इंचभर देखील हलला नाही, जाणून घ्या ‘कृष्णा बटर बॉल’चं रहस्य

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तमिळनाडूमधील महाबलीपूरममध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट झाली, या दरम्यान पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना महाबलीपूरमचे दर्शन घडवले. महाबलीपुरमच्या दक्षिण भारतीय संस्कृती आणि त्याच्या समृद्धी बद्दल माहिती दिली. दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

एका फोटोमध्ये पीएम मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एका मोठ्या दगडापाशी उभे असल्याचे दिसले. हा विशालकाय दगडापुढे दोन्ही देशाचे नेते हात वर करुन उभे होते. हा महाकाय दगडाचे काही अंशी पृष्ठभाग जमिनीला टेकून आहे आणि धोकादायक पद्धतीने झुकला आहे. दगड पाहून वाटेल की दगड कधीही घसरु शकतो. परंतू हा विशाल दगड मागील 1300 वर्षापासून तसाच्या तसा उभा आहे.

story of mahabalipuram krishna butter ball infront of which pm modi and xi jinping taken photo

कसा टिकून राहीला एका जागी हा दगड –
या विशाल दगडाचा फक्त काही अंश जमिनीवर आहे. हे अचंबित करणारे आहे, हे रहस्य दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी शी जिनपिंग यांना तेथे घेऊन गेले. या दगडापुढे फोटो देखील काढण्यात आले. आता सोशल मिडियावर हे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. या दगडाची देखील एक कथा आहे.

महाबलीपुरममध्ये असलेल्या या दगडाला लोक कृष्ण बटर बॉल असे म्हणतात. हा दगड पाहिला तर वाटेल की हा दगड कधीही घसरुन खाली येऊ शकतो. परंतू हा दगड 1300 वर्षांपासून आहे त्याच परिस्थितीत जागेवर आहे. अनेकादा हा धोकादायक वाटणारा दगड बाजूला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतू त्यात यश आले नाही.

मागील 1300 वर्षापासून या भागात अनेकदा भूकंप झाला, सुनामी आली, चक्रीवादळ आले, परंतू या सर्व अपत्तीच्या परिस्थितीत हा दगड अजून जसाच्या तसा उभा आहे.

story of mahabalipuram krishna butter ball infront of which pm modi and xi jinping taken photo

कृष्णा बटर बॉल चे वजन 250 टन –
कृष्णा बटर बॉल चे वजन 250 टन आहे, लोकांसाठी हे आश्चर्य आहे की इतके वजन असताना दगड इतक्या कमी भागावार कसा काय उभा आहे. याला पाहण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. हे महाबलीपूरम मधील एक दर्शनीय स्थळ आहे. लोक येथे फोटो काढण्यासाठी कायमच भेट देत असतात.

250 टनचा दगड नैसर्गिक पद्धतीने येथे असाच पडून आहे. या दगडाला कृष्णा बटर बॉल किंवा वानिराई काळ म्हणले जाते. वानिराई काळ म्हणजे आकाशाच्या देवाचा दगड. याला स्टोन ऑफ गॉड देखील म्हणले जाते. कृष्णा बटर बॉल 20 फूट उंच आणि 5 मीटर रुंद आहे. ही दगड 45 डिग्री कोनात झुकला आहे. दगड एवढा झुकलेला आहे की वाटेल की कधीही घसरेल. लोक याला दैवी चमत्कार मानतात.

कृष्णा बटर बॉल नाव का ठेवण्यात आले –
या दगडामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. स्थानिक हिंदू लोक सांगतात का हे श्री कृष्णाने चोरलेल्या लोण्याचा गोळा आहे. कृष्णाने आईच्या मडक्यातून लोणी चोरले होते, जे सुकला आहे. काही लोक याला स्वर्गातून पडलेला दगड मानतात. स्थानिक लोकांचे मानने आहे की स्वर्गातून पडलेला हा दगड इतका धोकादायक परिस्थितीत असताना देखील घसरत नाही.

या दगडाला येथून हलवण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, जेव्हा महाबलीपूरममध्ये पल्लव वंशाचे शासन होते. तेव्हा पासून हा दगड हलवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पल्लव वंशाचे नरसिंह देव बर्मन यांनी हा दगड येथून हटवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना देखील यश आले नाही. इंग्रजांनी देखील हा दगड हलवण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांना देखील त्यात यश आले नाही.

7 हाती मिळून दगड हलवण्याचा प्रयत्न पण अपयश –
1908 साली मद्रासचे गव्हर्नर आर्थर लावेल यांनी दगड हटवण्याचा प्रयत्न केला. इंग्रज सरकारला वाटत होते की एखाद्या हलचाली मुळे दगड घसरुन खाली असलेल्या गावावर पडू शकतो. त्यामुळे त्यांनी देखील दगड हलावण्याचा प्रयत्न केला. असे सांगण्यात येते की हा दगड हलवण्यासाठी 7 हाती आणण्यात आले होते परंतू ते हाती या दगडाला कणभर देखील हलवू शकले नाहीत. त्यानंतर हा दगड लोकांमध्ये प्रसिद्ध झाला.

आतापर्यंत हे सत्य उमगले नाही की एवढ्या छोट्या भागात दगड कसा काय स्थिर आहे. हा दगड फक्त 4 फूट बेसवर उभा आहे. वैज्ञानिक याचा शोध घेत आहेत की यावर गुरुत्वाकर्षण बल काम का करत नाही. गुरुत्वाकर्षणामुळे दगड हलून खाली घसरला पाहिजे परंतू वर्षानुवर्ष हा दगड जसाच्या तसा उभा आहे.

Visit : Policenama.com