अमेरिकेत ‘ओरॅकल’ करणार TikTok चं अधिग्रहण, ‘मायक्रोसॉफ्ट’चा प्रस्ताव फेटाळला

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकेत लोकप्रीय व्हिडिओ शेयरिंग अ‍ॅप टिकटॉकच्या अधिग्रहणाच्या रेसमध्ये ओरॅकलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. सूत्रांनी सांगितले की, टिकटॉकची मालकी असणार्‍या कंपनीने व्यवहारासाठी मायक्रोसॉफ्ट ऐवजी ओरॅकलची निवड केली आहे. या व्यवहारानंतर अमेरिकेत हे अ‍ॅप वापरात कायम राहू शकते. सत्या नडेला यांच्या नेतृत्वाखालील मायक्रोसॉफ्टची बोली फेटाळण्यात आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या अमेरिकेतील संचालनाच्या विक्रीसाठी 20 सप्टेंबरचा कालावधी दिला होता. ट्रम्प यांनी म्हटले होते की, जर 20 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकची विक्री कोणत्याही अमेरिकन कंपनीला दिली गेली नाहीत, तर अ‍ॅपवर प्रतिबंध लावला जाईल.

मायक्रोसॉफ्टने रविवारी घोषणा केली की, त्यांची बोली फेटाळण्यात आली आहे. टिकटॉक आणि व्हाईट हाऊसने यावर कोणतेही वक्तव्य केलेल नाही. तसेच ओरॅकलने सुद्धा सौद्याबाबत काहीही म्हटलेले नाही. ओरॅकलने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

टिकटॉकला वाचवण्यासाठी बदलला कायदा

सूत्रांनी रविवारी सांगितले की, टिकटॉकच्या कंपनीने मायक्रोसॉफ्टऐवजी ओरॅकलची निवड केली आहे. मायक्रोसॉफ्टने म्हटले की, आम्हाला विश्वास आहे की, आमचा प्रस्ताव टिकटॉकसाठी चांगला आहे. सोबतच आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचे सुद्धा संरक्षण केले असते. दरम्यान द न्यूयॉर्क टाइम्सनुसार, अजून स्पष्ट नाही की, टिकटॉककडून तांत्रिक भागीदारीच्या रूपात ओरॅकलची निवड त्यांच्याद्वारे सोशल मीडिया अ‍ॅपमध्ये बहुतांश भागीदारी करण्यासाठी सुद्धा आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये म्हटले आहे की, ओरॅकलला टिकटॉकचा तांत्रिक भागीदार घोषित केले जाईल. सौद्याला थेट विक्री म्हणता येणार नाही. यापूर्वी वॉलमार्टने या अधिग्रहणात मायक्रोसॉफ्टसोबत चांगली भागीदारी केली होती. वॉलमार्टने रविवारी म्हटले की, टिकटॉकमध्ये गुतवणूक करण्याची इच्छा आहे आणि आम्ही यासाठी बायटडान्स आणि इतरांशी बोलत आहोत.