दीपिका पादुकोण आणि विक्रांत मेसी यांचा KISS करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या दीपिका पादुकोणच्या छपाक या सिनेमाची शुटींग दिल्लीत सुरु आहे. यात दीपिका पादुकोणसोबत विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे ज्यांच्यावर अ‍ॅसिड हल्ला झाला होता. काही दिवसांपासून या सिनेमाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या सिनेमाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिपिका आणि विक्रांत एकमेकांना किस करताना दिसत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दिसत आहे. विक्रांत आणि दिपिका छतावर उभे आहेत आणि एकमेकांना किस करत आहे. दीपिकाने पिंक कुर्ता घातला आहे. यावेळीच दुसऱ्या घरांच्या छतावर उभे राहून अनेक लोक त्यांना पहात आहेत. याआधी शुटींगचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात दीपिका स्कुल यूनिफॉर्ममध्ये दिसली होती.

समोर आलेल्या एका वृत्तानुसार, शुटींग व्हिडीओ असे वेळोवेळी व्हायरल होत असल्याने या सिनेमाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार या सध्या चिंतीत आहेत. त्यांना असे अजिबात वाटत नाही सिनेमा प्रदर्शित होण्याआधी सिनेमाची काही माहिती बाहेर यावी. या सिनेमाचा विषयदेखील खूप संवेदनशील आहे. या सिनेमाच्या पुढील शेड्युलसाठी मुंबईमध्ये सेट लावण्याची तयारी सुरु आहे. परंतु या नवीन सेटअपसाठी सेक्युरीटी वाढवण्याचाही प्लॅन केला जात आहे.

दीपिका या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेच परंतु ती या सिनेमाची निर्मातीही आहे. पुढील वर्षात 10 जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात दीपिकाच्या भूमिकेचे नाव मालती आहे. मेघना गुलजार यांनी याआधी राजी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमाच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

You might also like