कर्नाटक : 7 दिवस क्वारंटाईन केले जातील ‘या’ 7 राज्यातून विमानानं येणारे प्रवासी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद म्हणाले की, महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश येथून येणाऱ्या स्थानिक विमान प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाइन मध्ये राहावे लागेल. यानंतर त्यांना आयसोलेशन मध्ये रहावे लागेल. कोरोना व लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी देशांतर्गत उड्डाणे सुरू होणार आहेत. अशात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने याबाबत मोठा एसओपी जारी केला आहे.

मात्र विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत अंतिम निर्णय केलेला नाही. विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे की, विमानतळ काउंटरवर कोणतेही चेक-इन केले जाणार नाही. केवळ वेब चेक-इन असलेले प्रवासीच विमानतळावर प्रवेश करू शकतात. मंत्रालयाने म्हटले की, उड्डाणात फक्त एका चेक इन बॅगला परवानगी असेल. विमान कंपन्या विमानांमध्ये खाद्य सेवा देणार नाहीत.

निश्चित भाड्याची खालची आणि वरची मर्यादा लक्षात घेतली जाईल. विमान कंपनीने प्रवाश्यांना विमानतळावर नियोजित उड्डाण करण्याच्या वेळेच्या किमान दोन तास आधी सूचित केले पाहिजे. उड्डाणाच्या ६० मिनिटांपूर्वी बोर्डिंग सुरू केले जाईल आणि उड्डाण होण्याच्या २० मिनिटांपूर्वी गेट बंद केले जातील. प्रवाशांची थर्मल तपासणी केली जावी आणि १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना वगळता सर्वांच्या मोबाईलवर आरोग्य सेतू ऍप असले पाहिजे. ऍपमध्ये ते “ग्रीन” दिसत नसल्यास त्यांना परवानगी दिली जाणार नाही.

एसओपीनुसार प्रवाशांनी उड्डाणाच्या दोन तास आधी विमानतळावर पोहोचले पाहिजे. ज्या प्रवाश्यांची उड्डाणे चार तासांच्या आत आहेत त्यांना टर्मिनल इमारतीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच राज्य सरकारे आणि प्रशासनाला प्रवासी आणि विमान चालक दलासाठी सार्वजनिक वाहतूक आणि खासगी टॅक्सीची व्यवस्था करावी लागेल. याव्यतिरिक्त केवळ खासगी वाहने किंवा निवडक कॅब सेवांना प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना विमानतळावर सोडण्याची किंवा नेण्याची परवानगी दिली जाईल. सर्व प्रवाश्यांनी मास्क आणि ग्लोव्हज घातले पाहिजेत.