खळबळजनक खुलासा ! ‘होय, मी नशेत तिच्यावर ‘बलात्कार’ केला अन् संदीपनं ‘व्हिडीओ’ बनवला’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पटना येथील बीबीए विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी विनायक सिंह याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 24 तासांच्या रिमांडवर असलेल्या विनायक सिंहने सांगितले कि, ‘हो, मी दारूच्या नशेत बलात्कार केला आणि संदीपने घटनेचा व्हिडिओ बनविला आहे. आम्ही ते चुकीचे केले. विद्यार्थिनीचे अपहरण करताना कुश, विकास आणि संदीप माझ्यासोबत होते. घटनेपूर्वी मी ड्रग्ज घेतले होते.’ दरम्यान संदीपदेखील विनायक सोबत पोलिस रिमांडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिला पोलिस स्टेशन प्रभारी आरती जयस्वाल या दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. सुरुवातीला संदीपने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कसून चौकशी नंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दुपारी पोलिसांच्या पथकाने दोन्ही आरोपींना बेऊर कारागृहातून रिमांडवर आणले होते.

आधीच रचला होता बलात्काराचा कट :
मिळालेल्या माहितीनुसार कुशच्या कुर्गी येथील रूमवर विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याचा कट विनायकने घटनेच्या तीन दिवस अगोदर रचला होता. यासंबंधित संपूर्ण माहिती विनायकने संदीपला सांगितली होती. ज्यावर संदीपनेही सहमती दर्शविली. विद्यार्थिनीला रात्रभर खोलीत ठेवण्याची या आरोपींची इच्छा होती. परंतु प्रसंगी घरमालक भाडे घेण्यासाठी पोहोचले. घरमालकाने मुलगी पाहिल्यानंतर आक्षेप घेतला. पोलिसांना सर्व काही सांगण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी घाईघाईने मुलीला तेथून बाहेर काढले.

प्रेमात ‘नाही’ म्हटल्यावर विनायकने उचलले पाऊल :
विनायकने सांगितले कि, संबंधित विद्यार्थिनी एकटीच राहत होती.आरोपींनी तिला पहिल्यांदा जीबी मॉलमध्ये पाहिले होते. त्याला ती आवडत असल्याने त्याने प्रेमाचा प्रस्तावही दिला. पण विद्यार्थिनीने नकार दिला. त्यामुळे चिडून त्याने अपहरण करून बलात्काराची घटना घडवून आणली.

संदीपची चौकशी केली असता त्याने सांगितले कि, मी बलात्कार केला नाही, मी घटनेचा व्हिडिओ बनविला, मात्र नंतर तो डिलिटही केला. तसेच विद्यार्थिनीने पोलिसात जाऊ नये, म्ह्णून तिला धमकीही दिली. दरम्यान, चौकशी करते वेळी विनायक संदीपला मारण्यासाठी उठला. संदीप संपूर्ण प्रकरणाचे खापर विनायकवर फोडत होता, ज्याचा त्याला राग येत होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना शांतपणे प्रश्नांची उत्तर देण्यास सांगितले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी रिमांडची वेळ संपताच दोन्ही आरोपींना परत बेऊर तुरूंगात पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी स्पीड ट्रायल करत आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/