हवेत ‘उड्डाण’ करण्यासाठी तरसले लोक, 10 मिनिटांत विकली गेली सिडनीहून तेथेच पोहोचणाऱ्या विमानाची तिकिटे, भाडे 43000 ते 2 लाख

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आपणास असा हवाई प्रवास करायला आवडेल का, ज्याचे गंतव्य नसेल? हे ऐकायला विचित्र वाटेल, परंतु ऑस्ट्रेलियामधील लोक कांतास एअरलाइन्सच्या अशाच विमानाचा भाग होण्यासाठी इतके उत्सुक होते की सर्व तिकिटे अवघ्या दहा मिनिटांत विकली गेली. वास्तविक, ऑस्ट्रेलियन एअरलाइन्सने सात तासांच्या अश्या प्रवासाची ऑफर दिली, जो सिडनी येथून सुरू होईल व तेथेच थांबेल. या रोमांचक प्रवासात प्रवाशांना उल्रुच्या वाळवंटातून ते ग्रेट बॅरियर रीफच्या मोहक समुद्रापर्यंत अनेक नेत्रदीपक ठिकाणांचे दृश्य पाहायला मिळतील.

कांतास एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, 10 ऑक्टोबरला विशेष उड्डाण चालविण्यात येईल. प्रवाशांना 134 जागा देण्यात आल्या. इकॉनॉमी क्लासचे भाडे जेथे 575 डॉलर (अंदाजे 43125 रुपये) ठेवले होते. त्याच वेळी, बिजनेस वर्गाची तिकिटे 2765 डॉलर्स (सुमारे 207375 रुपये) मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, लोक कोरोना काळातही हवाई प्रवासासाठी किती तळमळत आहेत, याचा अंदाज केवळ हवेत फिरणाऱ्या या उड्डाणात असलेल्या इंटरेस्टवरून लावला जाऊ शकतो. बुकिंग उघडल्यानंतर दहा मिनिटांतच त्याची सर्व तिकिटे विकली गेली. यासह, हे कांतास एअरलाइन्सचे सर्वात वेगवान बुक केलेले विमान बनले.

अंटार्क्टिकासाठी विशेष उड्डाण
कांतास एअरलाइन्स अंटार्क्टिकासाठी ‘जॉय फ्लाइट’ देखील चालवित आहे. या 13 तासांच्या नॉन स्टॉप उड्डाण अंतर्गत मेलबर्न येथून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना अँटार्टिकाच्या बर्फ़ाळ टेकड्या डोळ्यात कैद करण्याची संधी दिली जाते. ‘जॉय फ्लाइट’चे भाडे 876 डॉलर (सुमारे 65700 रुपये) आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like