‘डिंपल गर्ल’ दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचं म्हणणं आहे की, तिच्या यशात अभिनेता रणवीर सिंगचं मोठं योगदान आहे. दीपिका बॉलिवूडमधील टॉप अ‍ॅक्ट्रेसमध्ये समाविष्ट आहे. डिप्रेशनला हरवल्यानंतर ती आता सक्सेसफुल करिअर आणि हॅप्पी मॅरिड लाईफचा आनंद घेत आहे. या सर्व प्रवासात पती रणवीर सिंगचा मोठा वाटा आहे. याबाबत दीपिकाने भाष्य केलं आहे.

दीपिका म्हणाली, “मी आतापर्यंत जे काही मिळवलं आहे त्यातील जास्तीत जास्त मी रणवीरच्या सपोर्टमुळे मिळवू शकले आहे. आम्ही एक चांगली टीम आहोत. लग्नापूर्वी 7 वर्ष आम्ही खूप काही अनुभवलं. रणवीरने माझ्या करिअरमधील चढ उतार पाहिले आहेत. जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होते तेव्हा तो माझ्या सोबत होता. आम्ही आजही एकमेकांना एक्साईटेड फील करवत असतो आणि एकमेकांना इंस्पायर करत असतो. तो माझा एक चांगला मित्र आहे.”

View this post on Instagram

as if flowers are ever enough!🌺🌸🌼💐

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिकाला इंडस्ट्रीतील हायएस्ट पेड अ‍ॅक्ट्रेस मानलं जातं. दीपिका म्हणते, “मी किती कमावते याबाबत बोलणं माझ्या स्वभावात नाही. तथापि, मी याबद्दल संभ्रमित आहे कारण मला माहित आहे की आजच्या काळात याबद्दल बोलणे आवश्यक आहे. सर्वात जास्त फी घेणारी अदाकारा बनल्यानंतर मला वाईटही वाटतं. मला याची जाणीव आहे की, फी पेक्षाही चित्रपट माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा असायला हवा. मी स्वत: आता प्रोड्युसर बनले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी मला आता चांगल्या कळतात.”

View this post on Instagram

#GQ @gqindia

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

View this post on Instagram

#Cannes2018

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 

Visit : Policenama.com