एक होता रोहित शेखर : अपूर्वानेच केला खून, पोलिसांनी क्रिएट केला ‘तो’ सीन, जाणून घ्या ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी रोहितची पत्नी अपूर्वा हिला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणारी क्राईम ब्रांच, गुरुवारी रोहितची पत्नी अपूर्वाला घेऊन रोहितचा मृत्यू ज्या ठिकाणी झाला होता त्याठिकाणी गेली होती. यावेळी पोलिसांनी तिथे क्राइम सीन रीक्रिएट केला. यावेळी चालक अखिलेश आणि नोकर गोलू यांची देखील चौकशी करण्यात आली. ४ तासात अपूर्वा, चालक अखिलेश आणि गोलू यांना ४० प्रश्न विचारण्यात आले. याशिवाय पोलिसांनी अपूर्वाची वेगळी चौकशी देखील केली.

चालक आणि नोकराची कसून चौकशी

पोलिसांनी जसा गुन्हा घडला होता तो क्राइम सीन पुन्हा घडवून आणला त्यानंतर अपूर्वा ,चालक अखिलेश आणि नोकर गोलू यांची वेगवेगळी कसून चौकशी केली. त्यानंतर रोहितच्या मृत्यूदिवशी जे काही झाले होते तो घटनाक्रम पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या तिघांना काही तार्किक तर काही काल्पनिक प्रश्न विचारले.

अपूर्वाशिवाय खुनामागे आणखी कुणाचा हात नाही ना ?

रोहित शेखर केस प्रकरणी तपासकर्त्या पोलिसांनी कसून शोध घायला सुरुवात केली आहे. रोहितची पत्नी अपूर्वा शिवाय या प्रकरणात दुसऱ्या कुणाची तर भूमिका नाही ना ? याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे. क्राईम ब्रांचची टीम हे देखील जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहे की अपूर्वाने याबाबतीत कोणाशी काही बातचीत केली आहे का ? याचा तपास देखील पोलीस घेत आहेत.

रोहित शेखर खून प्रकरणात मांत्रिकाचा हात ?

पोलिसांनी अपूर्वा आणि रोहित शेखर या दोघांचेही फोन कॉल रेकॉर्ड तपासले आहेत. यात पोलिसांना असे आढळून आले आहे की अपूर्वाने एका व्यक्तीला फोन केला होता. पोलीस जेव्हा सीडीआरद्वारे त्या व्यक्तीपर्यंत पोहचले तेव्हा लक्षात आले की तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी असून एक मांत्रिक आहे. त्याला नेहमी अपूर्वा आणि तिच्या घरच्यांनाचे फोन येत होते. अपूर्वा आणि तिचा परिवार या मांत्रिकाचे सल्ले घेत होते. असे असले तरी पोलिसांना या मांत्रिकावर कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे समजले आहे.

अपूर्वा म्हणाली, हो मीच रोहितला मारले !

खरेतर या खून प्रकरणात संशयाची सुई सर्वप्रथम अपूर्वा ऐवजी चालक अखिलेश आणि नोकर गोलू यांच्याकडे होती. त्यामुळे अपूर्वा, अखिलेश आणि गोली या तिघांची आधी वेगवेगळी चौकशी करण्यात आली अंतर तिघांना एकत्र घेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी अपूर्वाने आधी उडवाउडवीची उत्तर दिली. पण शेवटी खरे समोर आलेच आणि अपूर्वा मोठ्याने ओरडली ‘हो मीच रोहितला मारले आहे’.

शांत राहत होती अपूर्वा

अपूर्वाला अटक केल्यानंतर अपूर्वा खूप शांत राहत होती. बुधवारी रात्री देखील तिने कोणाशी बोलणे केले नाही . गुरुवारी जेव्हा पोलिसांनी अपूर्वाची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक गोष्टीचे उत्तर ती नाही असे देत होती. तिला जेव्हा प्रश्न विचारत येत होते तेव्हा ती एकाच उत्तर द्यायची, ‘आता काय विचारायचे आहे ?’ सारखे -सारखे एकाच प्रकारचे प्रश्न का विचारात आहात ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like