‘या’ला व्हायचं होतं ‘IAS’, झाला ‘Gangster’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता राजीव खंडेलवालचा चित्रपट ‘प्रणाम’ चा पहिला लुक प्रदर्शित केला गेला आहे. चित्रपटाचा निर्माता रजनीश राम पुरी यांनी सांगितले की, चित्रपटामध्ये राजीव एक अशा व्यक्तीची भूमिका साकारणार आहे ज्याला लहानपणापासून आयएएस ऑफिसर बनायची इच्छा असते पण त्याच्या जीवनात असे काही घडते की, आएएसच्या जागी तो गॅंगस्टर बनतो.

रजनीश राम पुरीने पुढे सांगितले की, चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, अभिमन्यू सिंह आणि विक्रम गोखलेसारख्या कलाकारांचा जलवा पहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये राजीव दमदार डायलॉगसोबत जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. टीजरमध्ये अतुल कुलकर्णी आणि अभिमन्यू सिंह जबरदस्त डायलॉग बोलताना दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग लखनऊमध्ये झाली आहे.

https://www.instagram.com/p/B0OFAEnAvFt/

याआधी राजीव ‘आमिर’ आणि ‘टेबल नं २१’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘प्रणाम’ चित्रपटाचे निर्माते अनिल सिंह, नितिन मिश्रा आणि रजनीश राम पुरी आहे. चित्रपट रुद्राक्ष अ‍ॅडवेंचर्स प्राइव्हेट लिमिटेडच्या बॅनरद्वारे तयार केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘फरेब’ आणि ‘शूद्र द राइजिंग’ सारखे चित्रपट बनविणारे संजीव जायसवालने केले आहे.

खूप वर्षानंतर संजीव चित्रपट ‘प्रणाम’ द्वारे बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकाच्या रुपात वापसी करत आहे. याआधी प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट ‘शूद्र द राइजिंग’ ला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. दमदार कथा आणि अ‍ॅक्शनने भरलेला राजीव यांचा चित्रपट ९ ऑगस्टला दुनियाभरात १४०० स्क्रिनवर प्रदर्शित होणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –