अश्विनचे अभिनंदन करणार्‍या ट्विटमध्ये युवराज सिंहने असे काय लिहिले की फॅन्स भडकले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडमध्ये चार टेस्ट मॅचच्या सीरीजची तिसरी टेस्ट मॅच अहमदाबादमध्ये खेळली गेली. ही डे-नाईट टेस्ट मॅच टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांच्या आत 10 विकेटने जिंकली. यानंतर पिचबाबत खुप मोठी चर्चा सुरू आहे. अनेक माजी क्रिकेटर्सचे म्हणणे आहे की, असे पिच टेस्ट क्रिकेटसाठी चांगले नाही. या दरम्यान टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंहने एक असे ट्विट केले, ज्यामुळे गोंधळ उडाला आहे. ईशांत शर्माची ही 100वी टेस्ट मॅच होती, तर आर अश्विनने या मॅचमध्ये 400 टेस्ट विकेटचा आकडा गाठला. या दोन्हीसह अक्षर पटेलने या मॅचमध्ये एकुण 11 विकेट घेतल्या. या तिघांचे अभिनंदन करण्यासाठी युवराज सिंहने जे ट्विट केले, त्यामुळे फॅन्स खुप नाराज दिसत आहेत.

युवराजने ट्विट केले, मॅच दोन दिवसात संपली, नक्की सांगू शकत नाही की हे टेस्ट क्रिकेटसाठी चांगले आहे. जर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंहने अशाप्रकारच्या विकेटवर गोलंदाजी केली असती तर त्यांच्या नावावर 1000 आणि 800 विकेट नोंदल्या गेल्या असत्या. तरीसुद्धा अक्षर काय स्पेल होता! अभिनंदन. अश्विन, इशांतचे अभिनंदन.