रशियन अधिकाऱ्यानं पुढे केला हात तर राजनाथ सिंहनी केलं नमस्ते !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनाझेशनच्या बैठकीसाठी रशियाच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी मास्कोमध्ये पोहचल्यानंतर एक रशियन अधिकारी आणि राजनाथ सिंह यांच्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या रशियन अधिकाऱ्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला मात्र राजनाथ सिंहंनी हात न मिळवता नमस्ते केलं.

संरक्षण मंत्रालय कार्यालयाच्या ट्विटरवर राजनाथ सिंह मास्कोला पोहचल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ सोबत कार्यालयाने लिहिलं की, ‘संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मास्को मध्ये पोहचले आहेत.’ राजनाथ सिंह जेव्हा मास्को मध्ये पोहचले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अनेक रशियन अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. एयरपोर्टवर त्यांचं सर्वात आधी स्वागत मेजर जनरल बुकतेव युरी निकोलाईविच यांनी केलं. राजनाथ सिंह सर्वांना नमस्ते करत अभिवादन करत होते.

राजनाथ सिंह थोडे पुढे गेल्यानंतर जेव्हा एका रशियन अधिकाऱ्याने सेल्यूट करून आपला हात पुढे केला तेव्हा संरक्षण मंत्र्यांनी त्यांना नमस्कार करून उत्तर दिलं. त्यांनतर त्या दोघांमध्ये थोडा संवाद देखील झाला.

ट्विटर वरील संरक्षण मंत्रालय कार्यालयाच्या या व्हिडिओला लोकांची मोठी पसंती मिळत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 16 हजारांपेक्षा अधिक लाईक मिळाले असून दोन हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

राजनाथ सिंह तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असून ते 5 सप्टेंबर पर्यंत मास्कोमध्ये राहणार आहेत. ते शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनाझेशनच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रशिया दौऱ्यावर जाण्याआधी राजनाथ सिंहनी ट्विट केलं होतं, ‘मास्कोला दौऱ्यासाठी निघत आहे, या दरम्यान मी शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनाझेशनच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.