Coronil : ‘फक्त कोट अन् टाय बांधणारे रिसर्च करणार काय, धोतर घालणारे नाही करू शकत, आम्ही याच्यासाठी परवाना घेतलाय : बाबा रामदेव

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : योगगुरू बाबा रामदेव यांच्या वतीने कोरोनावर उपचारासाठी कोरोनिल औषधाच्या लाँचिंग प्रकरणात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने भारतीय सहायक सॉलिसिटर जनरलला नोटीस बजावली आहे. अशा परिस्थितीत रामदेव म्हणाले की, आम्ही कोरोनिलच्या क्लिनिकल चाचणीचा डेटा आयुष मंत्रालयाला पाठविला, आयुष मंत्रालयाकडून सर्व मंजुरी घेतल्या. आम्ही सर्व पॅरामीटर फॉलो केले. एफआयआर करा, देशद्रोही म्हणा किंवा दहशतवादी म्हणा काही फरक पडत नाही. त्यांनी म्हंटले कि, भारतात योगामध्ये काम करणे गुन्हा आहे. माझ्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. मी औषध तयार करुन एखादा गुन्हा केला आहे का, सत्कार करू शकत नसाल तर तिरस्कार तरी करू नका. ‘केवळ कोट -टाई वाले संशोधन करू शकतात का, धोतीवाले करू शकत नाही का ?.

रामदेव म्हणाले की, आता आम्ही कोरोनाबद्दल क्लिनिकल कंट्रोल चाचणीचा डेटा देशासमोर ठेवला तर वादळ उठले. त्या ड्रग माफिया, बहुराष्ट्रीय कंपनी माफिया, भारतीय आणि भारतविरोधी शक्तीची मुळे हादरली आहेत. बाबा रामदेव म्हणाले- ज्या प्रकारे देशद्रोहाच्या विरुद्ध गुन्हे दाखल होतात, अश्या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत, ही मानसिकता आपल्याला कुठे घेऊन जाईल, आम्ही 35 वर्षांपासून एकत्र काम करत आहोत, आम्ही दोघेही सामान्य कुटूंबातील आहोत, त्यामुळे लोकांना मिरची लागते. गेल्या तीन दशकात आम्ही लाखो लोकांना योग शिकविला आहे. आता जेव्हा मंत्रालयाने असेही म्हटले की, क्लिनिकल चाचणी केली गेली, तेव्हा लोक तीन दिवसात बरे झाले, आम्ही सर्व अप्रूवल देखील सबमिट केले.

आयुर्वेदातील वास्तव ना दडपू देणार, ना नष्ट होऊ देणार
रामदेव बाबा म्हणाले की, आयुष मंत्रालयाने असे म्हटले आहे की, कोविड व्यवस्थापनासाठी पतंजलीने जे काम केले आहे, त्याला आम्ही दुरुस्त करत आहोत. यामुळे काही लोक नक्कीच आनंदीत झाले असतील. दरम्यान, आम्ही व्यवस्थापन शब्दाचा वापर केला आहे, उपचार नव्हे. शब्दांच्या खेळात आम्ही आयुर्वेदाचे वास्तव दडपू देणार नाही, वा नष्ट होऊ देणार नाही.

योगगुरू म्हणाले की, या संपूर्ण चाचणीत असे दिसून आले आहे की, जेव्हा कोरोना विषाणू आपल्या फुफुसात प्रवेश करतो, तेव्हा रुग्णाला सर्वात मोठा धोका असतो, जर तो जंतू आत गेला तर तो शरीरात जातो आणि त्यासारखे अनेक जंतू बनवितो. जेव्हा आम्ही चाचणी केली, तेव्हा आढळले कि, या गोष्टी नियंत्रणात येत आहेत. ज्यांचा आजार 6 स्तरापर्यंत वाढला होता, ते एक किंवा दोन स्तरावर खाली आला आहे. आम्ही चाचणीत काय केले हे वैज्ञानिक डेटा आहे आणि ते मंत्रालयाला देण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्विट केले की, आमच्याकडे जी काही माहिती मागितली गेली होती, ती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहेत. बाळकृष्ण यांनी ट्विट केले की, ‘हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन आणि गौरव देत आहे. जे संवादाचे अंतर होते ते आता दूर झाले आहे. क्लिनिकल चाचण्यांचे सर्व मानक मापदंड 100% पूर्ण झाले. आम्ही आयुष मंत्रालयाला ही सर्व माहिती दिली आहे.

वास्तविक, कोरोनिलच्या लाँचिंगनंतर उच्च न्यायालयाचे वकील मणि कुमार यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, पतंजली योगपीठच्या दिव्य फार्मसी कंपनीने जागतिक साथीच्या कोरोनापासून मुक्ततेसाठी कोरोनिल औषध तयार करण्याचा दावा केला आहे. रामदेव बाबा यांनी आपले सहकारी आचार्य बालकृष्ण यांच्यासह मंगळवारी हरिद्वारमध्ये या औषधाची सुरूवात केली. याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे ,की रामदेव बाबा यांनी या संदर्भातील नियमांचे पालन केले नाही.