रवीना टंडनचं खळबळजनक विधान, म्हणाली – ‘रोल मिळवण्यासाठी कधी कोणत्या अभिनेत्याबरोबर….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अनेक सेलेब्सने इंडस्ट्रीबाबत मोठे खुलासे केले आहेत. आता रवीना टंडनने बॉलीवुड इंडस्ट्रीबाबत एक असे वक्तव्य केले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. रवीनाने ‘पिंकविला’साठी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, इंडस्ट्रीमधील लोक त्यास अरोगंट म्हणत होते. रवीनाने म्हटले. माझा कुणीही गॉडफादर नव्हता, मी कोणत्याही कॅम्पचा भाग नव्हते आणि कुणी हिरो सुद्धा मला प्रमोट करत नव्हता. मी कोणत्याही हिरोसोबत झोपले नाही आणि कोणत्या हिरोबरोबर माझे अफेयर सुद्धा नव्हते. मी कोणत्याही हिरोच्या सांगण्यावरून वागत नव्हते, तो जेव्हा सांगेल तेव्हा हसायचं. तो सांगेल तेव्हा बसायचं.

रवीनाने नंतर त्या महिला पत्रकारांवर आपला राग व्यक्त केला ज्या तिच्या बाजूने उभ्या राहिल्या नाहीत. रवीना म्हणाली की, अनेक महिला पत्रकार स्वताला फेमिनिस्ट समज होत्या आणि अल्ट्रा फेमिनिस्ट कॉलम लिहित होत्या, परंतु त्या दुसर्‍या महिलांसोबत चूकीच्या वागत होत्या.

रवीनाने सांगितले की, तिच्या इमानदारीमुळे तिने चित्रपट गमावले नसले तरी तिच्याबाबत खुप उलटसुलट लिहिले गेले.

यापूर्वी ट्विट करत केले होते मोठे खुलासे

रवीनाने यापूर्वी ट्विट करत म्हटले होते की, असे होते की तुम्हाला चित्रपटातून काढले जाते. हिरो आपल्या गर्लफ्रेंडला चित्रपटात घेतात किंवा आपल्या लोकांद्वारे एखाद्या बद्दल फेक न्यूज पसरवून त्याचे करियर खराब करतात. तुम्हाला खुप स्ट्रगल करावा लागतो. परंतु, काही लोक हे सहन करतात आणि काही करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही यांच्याविरोधात आवाज उठवता, तेव्हा तुम्हाला खोटे ठरवले जाते, वेडे म्हटले जाते. या इंड्रस्ट्रीत आल्याने तिची मी आभारी आहे, परंतु हे सत्य आहे.

अ‍ॅक्ट्रेसने पुढे सांगितले होते की, असे कुणासोबतही होऊ शकते, जे इंडस्ट्रीमध्ये निर्माण होतात, इनसायडर जसे की मी किंवा आऊटसायडर. जेवढे त्यांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला, तेवढे मी फाइट बॅक केले. घाणेरडे राजकारण प्रत्येक ठिकाणी असते.