‘प्लास्टिक’ कचऱ्याद्वारे रस्ता बनवणं झालं सोपं, रिलायन्सनं प्रायोगिक तत्वावर NHAI ला देण्यासाठी केलं सादर…

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने प्लास्टिकच्या कचर्‍यापासून रस्ते तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएसएआय) देण्यास तयारी दाखवली आहे. या तंत्रज्ञानाद्वारे रस्ता निर्मितीसाठी प्लास्टिक वापरता येईल. कंपनीने अनेक जिल्ह्यमध्ये याबाबतची चाचपणी केली आहे. कंपनीने आपल्याकडील पन्नास टन प्लास्टिक पासून 40 किमी लांबीचा रस्ता बनवला आहे.

18 महिन्यांमध्ये विकसित झाली प्रणाली
कंपनीच्या पेट्रोकेमिकल्स व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपुल शहा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, रस्ता बांधकामात रिकामे पॅकेट्स, पॉलिथिन पिशव्या या सारखा प्लास्टिक कचरा वापरण्यासाठी एक यंत्रणा विकसित करण्यास सुमारे 14 ते 18 महिने लागले. या अनुभवाविषयी आम्ही एनएचएआयशी बोलतो आहोत. जेणेकरून प्लास्टिक कचरा रस्ता बांधकामात वापरता येईल असे देखील शहा यावेळी म्हणाले.

एनएचएआय व्यतिरिक्त कंपनी देशभरातील राज्य सरकारला आणि स्थानिक छोट्या कंपन्यांना देखील याबाबत माहिती देण्यासाठी बोलणी करत आहे. ज्या प्लास्टिकचे रिसायकल होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरण्याचा कंपनीचा विचार याठिकाणी आहे.

एक कि.मी रस्ता निर्मितीमध्ये वाचणार एक लाख रुपये
शहा यांनी सांगितले की, एक कि.मी रस्ता बवण्यासाठी एक टन प्लास्टिक लागते. यामुळे एक लाख रुपयांची बचत देखील होते. अशाप्रकारे आम्ही चाळीस लाख रुपये वाचवले असल्याचे देखील शहा यांनी स्पष्ट केले. यामुळे रस्त्याची गुणवत्ता देखील वाढते. अवघ्या दोन महिन्यात अशा प्रकारच्या रस्त्याची निर्मिती होते. विशेष म्हणजे यातून निर्माण झालेला रस्ता गेल्या वर्षी आलेल्या जोरदार पावसातही तग धरून होता.

फेसबुक पेज लाईक करा –