Coronavirus : डोंगराळ भागात राहणार्‍यांना ‘कोरोना’ संक्रमणाचा धोका खुपच कमी, जाणून घ्या

लंडन : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरस डोंगराळ भागात राहणार्‍या लोकांसाठी कमी धोकादायक ठरत आहे. बोलीविया येथील हाय एल्टिट्यूड पल्मोनरी अ‍ॅण्ड पॅथोलॉजी इन्स्टीट्यूटचा शोध याबाबतच सांगत आहे.

संशोधकांनी सांगितले की, डोंगराळ भागात राहणारे लोक जैविकदृष्ट्या रक्तातील कमी ऑक्सिजनच्या मात्रेच्या आधारे जगण्यासाठी तयार असतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीला रक्तातील ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्यानेच श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीराचे अवयव खराब होण्याची समस्या होते. ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हेंटिलेटरचा आधार घ्यावा लागतो.

रेस्पिरेटरी फिजियोलॉजी आणि न्यूरोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध या शोधनिबंधात, डोंगराळ भागात राहार्‍यांनी कोरोना सहजतेने घेऊ नये, असाही सल्ला दिला आहे.

सर्दी-खोकला-ताप सतावत नाही : संशोधनात डोंगराळ भागात सापडलेले अर्ध्यापेक्षा जास्त रूग्ण असिम्टोमॅटिक होते. म्हणजे त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह होता, पण त्यांच्यात सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे नव्हती.

एसीई-2 एंजाइमचा स्तरसुद्धा कमी : त्यांनी सांगितले की, डोंगराळ भागात राहणार्‍या लोकांमध्ये एसीई-2 एंजाइमचा स्तर खुपच कमी असतो. हे तेच एंजाइम आहे, ज्याच्या मदतीने सार्स-कोव-2 व्हायरस फुफ्फुसातील पेशी आणि उतींना संक्रमित करतो.

कमी ऑक्सीजनचा परिणाम : डोंगराळ भागात राहणारे लोक सुरूवातीपासून कमी ऑक्सिजनवाल्या वातावरणात राहतात. यामुळे त्यांचे शरीर जैविकदृष्ट्या धमण्यांमध्ये ऑक्सीजनचा कमी प्रवाह असूनही सामान्य रूपाने करण्यासाठी अनुकूल होते.