अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा ‘सोनू सूद’, ‘कोरोना’ उपचारात करणार डॉक्टरांची मदत

भागलपूर : वृत्तसंस्था –  भागलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून एमटेक करणाऱ्या आकाश सागरने ‘सोनू सूद द वॉरियर’ नावाचा एक रोबोट डिझाइन केला आहे, जो कोरोनाच्या उपचारात डॉक्टर आणि परिचारिकांना मदत करेल. तसेच रुग्णांपासून अंतरही राहील. याचे वैशिष्ट्य आहे की, रोबोट रूग्णांपर्यंत पोहोचताच डॉक्टरांना रुग्णाचे चित्र, त्याचे तापमान, ऑक्सिजनची पातळी मोजून तो संदेश मोबाइलवर पाठवेल. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या सूचनेनुसार रुग्णांना आवश्यक ते औषधही उपलब्ध करुन देईल.

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आकाश सागर म्हणाला की, हा रोबोट मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि व्हीएलएसआय तंत्रज्ञानावर काम करतो. याचा उपयोग संगणकाद्वारे किंवा मोबाईलशी कनेक्ट करून केला जाईल. तो म्हणाले की, अभिनेता सोनू सूद यांच्या प्रेरणेने या रोबोटचे नाव ‘सोनू सूद द वॉरियर’ ठेवले गेले आहे. त्याचे पेटंट मिळवण्यासाठी देखील लवकरच कामही सुरू केले जाईल.

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.पुष्पलता म्हणाल्या की, रोबोटला संगणक व मोबाईलशी जोडल्यास सर्व संदेशांची देवाणघेवाण होऊ शकते. आकाश या प्रकल्पात चांगले काम करत आहे. यासंबंधी माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे.

इंजिनियर असलेल्या बहिणीसोबत एकत्र केले काम

आकाश मूळचा पाटणा गांधी चौकातील राहणारा आहे. त्याने सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान त्याने आपल्या इंजिनियर बहीण स्नेहलतासह या प्रकल्पावर काम सुरू केले. लॉकडाऊननंतर ते कॉलेजमध्ये दाखवले जाईल. हे केवळ कोरोनाच नव्हे तर कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाच्या रूग्णांवर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात मदत करेल. रोबोट यूबी रेजपासून स्वतःला स्ट्रलाईज देखील करत राहतो.

औषधांपासून ते लिक्विड आहारही देईल

या रोबोटचे वैशिष्ट्य आहे की, तो रुग्णांना आवश्यक औषधे, अन्न आणि लिक्विड आहारही बेडच्या हिशोबाने देईल. तसेच रुग्णांची सर्व माहिती देखील त्याच्याकडे ठेवेल. प्रभारी प्राचार्य डॉ. मणिकांत मंडल म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बर्‍याच क्षेत्रात चांगले काम केले आहे.