RRB NTPC Exam 2020 : रेल्वे भरती मंडळाने NTPC च्या रिक्त जागांची संख्येत वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

आरआरबी एनटीपीसी परीक्षा २०२०

रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) एनटीपीसी परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना एक चांगली बातमी दिली आहे. आरआरबी अलाहाबाद (rrbald) यांनी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी रिक्त पदांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. रेल्वे भरती मंडळाच्या अधिसूचनेनुसार २८-०२-२०१९ नॉन टेक्निकल पॉपुलर कॅटेगरी (एनटीपीसी) च्या विविध पदे भरण्यासाठी सेंट्रलाइज्ड नोटिफिकेशन (सीईएन) नं क्रमांक -०१ / २०१९ रोजी प्रकाशित केली गेली. या अधिसूचनेमध्ये मेट्रो रेल्वे कोलकत्ता वाहतुक सहाय्यक (श्रेणी -८) च्या रिक्त जागांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी या पदाच्या ८७ रिक्त जागा होत्या ज्या वाढवून १६० करण्यात आल्या आहेत.

सुधारित रिक्त पदांचे तपशील –

अनारक्षित_ ६५

एससी – २४

एसटी – १२

ओबीसी – ४३

ईडब्ल्यूएस- १६

एक्झमैन – १६

एकूण रिक्त जागा – १६०

रेल्वे भरती मंडळाने म्हटले आहे की भरती विज्ञापन संख्या_ CEN-०१ / २०१९ च्या अधिसूचनेमध्ये अन्य पदांच्या रिक्त जागांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.