RTI धमकावण्याचं हत्यार बनलंय, सुप्रीम कोर्टानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आरटीआयचा कायदा सध्या धमकी देण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जात असल्याची माहिती सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली. कायद्याच्या भीतीने अधिकारी निर्णय घेण्याला घाबरत आहेत त्यामुळे कामे अडकून पडलेली आहेत. लोकांनी या कायद्याला व्यवसाय करून टाकला आहे. मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली ही माहिती देण्यात आली. यावेळी, न्यायालयाने केंद्र सरकारला तीन महिन्यांत माहिती आयुक्तांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच माहितीच्या कायद्याविरोधात अशा कठोर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीशांच्या कार्यालयाला आरटीआयच्या कक्षेत आणण्याचे आदेश दिले होते.

आरटीआयचा गैरवापर रोखण्यासाठी आणि त्याद्वारे गुन्हेगारी रोखण्यासाठी माहिती अधिकार कायद्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्याची गरज असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (16 डिसेंबर) सांगितले. केंद्रीय माहिती आयोग (सीआयसी) आणि राज्य माहिती आयोग (एसआयसी) मध्ये माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याच्या याचिकेवर सुनावणी करीत सर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकारांशी संबंध नसलेल्यांकडून माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करण्याचा मुद्दा उपस्थित केला.

सरन्यायाधीश एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, “आम्ही आरटीआय कायद्याच्या विरोधात नाही परंतु आम्हाला असे वाटते की त्याच्या नियमनासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे.” “काही आरटीआय दाखल करणाऱ्या लोकांचा विषयाशी काहीही संबंध नसतो. अनेकदा याचा वापर केवळ धमकीसाठी केला जातो ज्यास ब्लॅकमेल देखील म्हटले जाऊ शकते. त्यामुळे याबाबत नियमावली ठरायला हवी अशी अशा व्यक्त केली आहे.

अर्जदारांचा पुरावा आरटीआय अंतर्गत गंभीर समस्या असल्याचे सांगत खंडपीठाने म्हटले की ते या कायद्याच्या विरोधात नाही परंतु बाधित लोक किंवा संबंधित लोक या अधिकाराचा वापर करतील याची खात्री करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली जावी. मुख्य न्यायाधीशांनी यावेळी आपला अनुभव सांगितला आणि ते म्हणाले की, एकदा एका अधिकाऱ्याने त्यांना सांगितले की आरटीआय अंतर्गत प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील मंत्रालयाचे काम रखडले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/