65000 आशा कर्मचार्‍यांच्या वेतनात होऊ शकते मासिक 2000 रुपये वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोविड-19 संकटादरम्यान महत्वपूर्ण काम करत असल्याबद्दल प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्रातील 65,000 आशा कर्मचार्‍यांचे मासिक वेतन 2,000 रुपयांनी वाढवले जाऊ शकते. एका सरकारी अधिकार्‍याने सांगितले की, मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता म्हणजेच आशा कर्मचार्‍यांना 10,000 रूपये मासिक वेतन मिळते.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या एका अधिकार्‍याने पीटीआयला ही माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या वेतन वाढीच्या प्रस्तावाला अंतिम रूप दिले आहे, ज्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल. जर प्रस्ताव मंजूर झाला तर आशा कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनात दोन हजार रूपयांची वाढ होईल.

कोविड-19 संकटात आशा कर्मचार्‍यांना शहरी आणि ग्रामिण भागात देखरेख करण्याचे काम दिले गेले आहे. राज्य सरकार आता त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करत आहे.