जेव्हा Live टीव्ही शोमध्ये फ्लोरवर पडलेले पैसे गोळा करत होता ‘भाईजान’ सलमान ! कॅटरीनानंही दिली ‘साथ’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या जबरदस्त व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान चक्क फ्लोरवरील पैसे गोळा करताना दिसत आहे. यावेळी कॅटरीना कैफही तिथं उपस्थित होती. सलमानचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ एका रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. व्हिडीओ दिसत आहे की, स्टेजवर सलमान खान आदित्य नारायण आणि कॅटरीना कैफ आहे. व्हिडीओत दिसत आहे की, आदित्य सलमानला काहीतरी बोलत आहे आणि सलमान फ्लोरवर पडलेले पैसे गोळा करत आहे. आधी कॅटरीना हे सगळं पहात असते पंरतु नंतर तीही त्याला पैसे गोळा करण्यासाठी मदत करताना दिसते.

https://www.instagram.com/p/CAUZ4CghKBK/?utm_source=ig_embed

सलमान खानचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याला पैशांची खूप कदर आहे असं ते म्हणत आहेत. सलमानचं हे वागणं चाहत्यांना खूप आवडलं आहे. सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु आता लॉकडाऊनमुळं हे शक्य होईल असं काही वाटत नाही.