भाग्यश्रीचा सर्वात मोठा ‘गौप्यस्फोट’ ! ‘मैने प्यार किया’ सिनेमाच्या शुटींगदरम्यान ‘भाईजान’ सलमान खान करायचा ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार भाग्यश्री हिनं सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून डेब्यू केला होता. 1989 मध्ये आलेल्या या पहिल्याच सिनेमातून तिनं लोकांच्या मनात घर केलं. हा सिनेमा आला आणि भाग्यश्री रातोरात स्टार झाली. या सिनेमाच्यावेळीच भाग्यश्री आणि हिमालय दासानी रिलेशनशिपमध्ये होते. भाग्यश्रीनं अलीकडेच सलमानबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी सांगितल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. तिनं सांगितलं की, सलमान खानला या सिनेमाच्या वेळीच माहिती होतं की, ती हिमालयसोबत रिलेशनमध्ये आहे.

पुढे भाग्यश्री म्हणते, “तो माझ्या मागे मागे यायचा आणि माझ्या कानात गाणं गायचा. मी त्याला वॉर्निंग द्यायचे की, लोक आपल्याबद्दल बोलायला सुरुवात करतील. तर तो म्हणाला होता की, तो हिमालयला ओळखतो. सलमान हिमालयला एकदाच भेटला आहे.”

भाग्यश्रीला जेव्हा विचारण्यात आलं की, सिनेमाचा रिमेक तयार केला तर तिच्या रोलमध्ये तिला कोणाला पहायला आवडेल. तेव्हा ती म्हणाली, “आलिया भट खूप शानदार अ‍ॅक्ट्रेस आहे.” म्हणजेच तिच्या रोलसाठी तिनं आलिया भटला पसंती दाखवली. तर सलमानच्या रोलसाठी तिनं रणवीर सिंग आणि रणबीर कपूरचं नाव घेतलं.

https://www.instagram.com/p/B88b5xIH69q/

https://www.instagram.com/p/B83D9VlBm9W/