भाऊ इब्राहिमनं केली होती मेल्याची अ‍ॅक्टींग, धाय मोकळून रडली होती सारा अली खान ! पहा अभिनेत्रीचा वजन घटवण्यापूर्वीचा लुक (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सारा अली खान कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. पुन्हा एकदा सारा अली खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो वेगानं व्हायरल होत आहे. खास बात अशी की, यात साराचा तो लुक आहे जेव्हा तिचं वजन खूपच वाढलं होतं.

सारानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. साराचा हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा तिचं वजन खूप वाढलं होतं. या व्हिडीओत तिचा भाऊ इब्राहिम अली खान हाही दिसत आहे. दोघंही भाऊ बहिण यात अ‍ॅक्टींग करताना दिसत आहे. इब्राहिमनं यात मरण्याची अ‍ॅक्टींग केली आहे आणि सारानं धाय मोकळून रडताना दिसत आहे. आरडा ओरडा करत ढसा ढसा रडणारी सारा नक्कीच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यात तिचा भाऊ इब्राहिम मात्र तिचा आरडा ओरडा पाहून मध्ये मध्ये हसताना दिसत आहे.

साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. चाहत्यांनाही साराची अ‍ॅक्टींग खूप आवडली आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहेत.