SBI ची बंपर ऑफर ! जिंकू शकता कार ; असं करा अप्लाय 

 नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने  (SBI ) आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना नवीन ह्युंदाई सँट्रो (Hyundai Santro) जिंकण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर ३० जून २०१९ पर्यंत लागू असेल.

SBI ने या ऑफरविषयी ट्वीट करत माहिती दिली आहे की, ‘जो ग्राहक  Yono अ‍ॅपवरून ह्युंदाई वेन्यू (Hyundai Venue) बुक करेल त्यालाच Hyundai Santro कार जिंकण्याची संधी मिळेल. तसेच या व्यतिरिक्त ग्राहकांना आकर्षक व्याजदरावर  SBI वाहनकर्ज  मिळेल.  तर जाणून घ्या कार बुकिंग  करण्याबद्दल –

अशी करा बुकिंग –
सर्वप्रथम SBI चे Yono अ‍ॅप इंस्टॉल करा.
त्यानंतर त्या अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन करा.
जर तुम्ही SBI च्या  इंटरनेट बँकिंगचा वापर करत असाल तर यूजर नेम, पासवर्ड और रेफरल कोड टाकून सबमिट करा.
जर तुम्ही SBI च्या  इंटरनेट बँकिंगचा वापर करत नसाल तर तुम्हाला  ATM कार्डच्या डिटेल्स द्याव्या लागतील.
आणि जर  एटीएम कार्डही  नसेल तर संबंधित शाखेत जाऊन  Yono अ‍ॅपच्या या योजनेचा  फायदा घेऊ शकता.