home page top 1

येत्या १० दिवसात SBIची ‘ही’ सुविधा एकदम ‘फ्री’, कोट्यावधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. त्यामुळे एसबीआय नेहमीच आपल्या ग्राहकांच्या सुविधेचा विचार करून अनेक बदल करत असते. एसबीआयने पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत आयएमपीएस ही सुविधा १ ऑगस्टपासून पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. म्हणजे १० दिवसांनंतर एसबीआयच्या ग्राहकांना आयएमपीएस द्वारे होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर अधीकचे पैसे लागणार नाहीत. आजपर्यंत आयएमपीएस केल्यावर बँक त्यावर चार्जेस घ्यायची. मात्र आता हा चार्ज रद्द करण्यात आला आहे.

यापूर्वी एसबीआय बँकेने आरटीजीएस आणि एनईएफटी चार्ज, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगचे चार्ज कस्टमरसाठी १ जुलैपासून बंद करण्यात आले होते. आता बँक आयएमपीएस चार्ज इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग कस्टमरसाठी १ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे. १ मार्च २०१९ पर्यंत एसबीआयचे ६ कोटी ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करत आहेत. तर १.४१ कोटी लोक मोबाइल बँकिंगचा वापर करत आहेत. एसबीआय बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर १ कोटी युजर आहेत.

बँकेने हे बदल करण्यामागे बँकेचा हेतू असा आहे की एनइएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएस चार्ज बंद केले तर डिजिटल ट्रांजेक्शन करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढेल. तसंच बँकेने ब्रांच नेटवर्कद्वारे आयटीजीएस आणि एनईएफटी करणाऱ्या ग्राहकांसाठी २० टक्के चार्ज कमी केले आहेत.

आरटीजीएस सर्विस नेमकी काय आहे हे जाणून घ्या-

१. या सुविधेमुळे तुम्ही २४ तास कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. तसंच या सुविधेची चांगली गोष्ट म्हणजे याद्वारे केलेले व्यवहार लगेच होतात आणि समोरच्याच्या खात्यात लगेच पैसे जमा होतात.

२. ही सुविधा कधीही वापराता येते. तसंच बँकेच्या सुट्ट्या असल्यास या सुविधेचा वापर करता येतो.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like