SBI आता ग्राहकांना नाही देणार ‘ही’ सुविधा, पुर्वी फ्रीमध्ये मिळायची, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी गृह कर्ज, वाहन कर्ज या सारख्या कर्जावरील व्याज दरात कपात केली असली तरी बँकेने ग्राहकांकडून त्यावर लागणारे प्रोसेसिंग शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एका बाजूला व्याजदर कमी झाले असले तरी ग्राहकांना कर्ज घेताना आपला खिसा थोडा ढिल्ला करावा लागणार आहे. आता बँक फक्त कर्जावरच नाही तर टॉपअप वर देखील प्रोसेसिंग शुक्ल आकारेल.
एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की व्याजदर कमी केल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांची भरपाई म्हणून बँकेने हे पाऊल उचलले आहे. सणासुदीला ग्राहकांना खरेदी करण्यास प्रोस्ताहन देण्यासाठी बँककडून प्रोसेसिंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचे सांगितले होते. याचा परिणाम बाजारात दिसून आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी बचत आणि एफडीवर व्याजदरही कमी केले होते. त्यामुळे कर्ज स्वस्त झाले होते. परंतू दुसऱ्या बाजूला ग्राहकांच्या खिशात हात घालून बँक प्रोसेसिंग शुल्क काढून घेत आहे. सणासुदीदरम्यान रद्द करण्यात आलेले प्रोसेसिंग शुल्क 16 ऑक्टोबर पासून बंद करण्यात येईल.
याबरोबर एसबीआय आता फक्त गृह कर्ज नाही तर टॉप अप प्लॅन, कॉर्पोरेट आणि बिल्डर्सला देण्यात येणाऱ्या कर्जावर प्रोसेसिंग शुल्क वसूल करण्यात येईल. कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना 0.4 टक्के प्रोसेसिंग शुल्क आकारण्यात येईल. हे शुल्क 10 हजारापासून 30 हजार रुपये आहे. तर बिल्डरसाठी 5 हजार रुपये फ्लॉट शुल्क द्यावे लागेल.
Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी