‘स्कॉलरशीप’साठी आता 75 % उपस्थिती बंधनकारक नाही राहणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीपसाठी असणारी 75% उपस्थितीची अनिवार्यता आता राहणार नाही. कोरोना काळात शाळा-कॉलेज बंद असल्याने आणि ऑनलाईन शिक्षणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नॅशनल काऊन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशनकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ज्याची सूचना मागील काही दिवसात शासनाकडून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देण्यात आली होती.

या वर्षी कोरोनामुळे सर्व शाळा-कॉलेज मार्च पासून बंद आहेत. सध्या सगळीकडे ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु आहेत. असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा कॉम्पुटरची सोय नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही.

अशा विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन 75% उपस्थिती असण्याची जी अनिवार्यता होती ती काढून टाकण्याची निर्णय घेण्याचा तयारीत सरकार आहे. अल्पसंख्यांक विभागाकडून जी शिष्यवृत्ती दिली जाते त्यासाठी 75% उपस्थिती अनिवार्य असते पण कोणत्याही कारणाने हे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे सचिव मनोज कुमार सिंह यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही माहिती दिली होती. प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर तो नॅशनल काऊन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन कडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीपसाठी असणारी 75% उपस्थितीची अनिवार्यता आता राहणार नाही.