जेव्हा वसुंधरा राजेंना हिरव्या रंगाच्या साडीत पाहून फोटो जर्नलिस्टच्या तोंडातून निघलं ‘पाकिस्तान’, जाणून घ्या काय झालं

जयपूर : वृत्तसंस्था-  राजस्थानमध्ये आज विधानसभेचे अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जेवहा भाजपा नेत्या आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसूंधरा राजे विधानसभेत आल्या तेव्हा एक असा प्रसंग घडला, जो पाहून त्या स्वत: हैराण झाल्या. शुक्रवारी सकाळी राजस्थान विधानसभेत प्रवेश करताना वसूंधरा राजे यांना हिरव्या रंगाच्या साडीत पाहून एका अज्ञात फोटो जर्नलिस्टच्या तोंडातून अचानक पाकिस्तान शब्द निघाला. फोटो जर्नलिस्टची ही कमेंट ऐकल्यानंतर वसूंधरा राजेंचे पाय क्षणभर थबकले, त्या कन्फ्यूज दिसल्या, पण पुन्हा काहीही न बोलता त्या आत निघून गेल्या.

मात्र, नंतर त्या फोटो जर्नलिस्टने म्हटले की, त्याला राजस्थान बोलायचे होते, पण तोंडातून अचानक पाकिस्तान शब्द निघाले. राजस्थान विधानसभा अधिवेशनाला सुरूवात झाली आहे आणि भाजपाने घोषणा केली आहे की, ते राज्यातील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरूद्ध अविश्वास ठराव आणणार. पण अशोक गेहलोत सरकारने सुद्धा घोषणा केली आहे की, त्यांचे सरकार विश्वास मताला सामोरे जाईल. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सचिन पायलट आणि 18 अन्य नाराज आमदारांना पक्षात परत आणण्याची घोषणा केल्यानंतर ताबडतोब आज विधानसभा अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या दरम्यान, काँग्रेसने म्हटले की, भाजपला काऊंटर करण्यासाठी आम्ही एकजुट आहेत.

महिनाभर चालले सत्तासंकट
राजस्थानमधील राजकीय संकट महिन्यापूर्वी तेव्हा सुरू झाली, जेव्हा तत्कालीन उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरूद्ध बंडखोरी केली होती. पायलट आपल्या जवळच्या आमदार आणि मंत्र्यांसोबत दिल्ली, हरियाणाला गेले होते. दरम्यान, पायलट यांनी दावा केला होता की, गेहलोत सरकारकडे बहुमत नाही. मात्र, गेहलोत यांनी हा दावा फेटाळून जास्त आमदार आपल्याकडे असल्याचे म्हटले होते. नंतर, गांधी कुटुंबाच्या हस्तक्षेपानंतर राजस्थान संकट दूर झाले आणि पायलट राजस्थानमध्ये परतले.