कानपूर प्रकरण : अटक शशिकांत पांडेच्या पत्नीचा Live ऑडिओ व्हायरल , ‘सर्व पोलिस आहेत, विकास भैय्याने त्यांना मारले’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : यूपीच्या कानपूरमध्ये आठ पोलिसांच्या हत्येचा आरोपी विकास दुबे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये ठार झाला, परंतु त्या प्रकरणाचा हळू- हळू खुलासा होत आहे. मंगळवारी पोलिसांनी विकास दुबेचा साथीदार फरार गुन्हेगार आणि 50 हजारांचा इनाम असणारा शशिकांत उर्फ सोनू पांडे यांना अटक केली. त्याच्या चौकशीवरून इंसास आणि एके 47 रायफल्स आणि काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर शशिकांतच्या पत्नीचा ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते की, माझ्या अंगणात पोलिस आहेत, विकास भैयाने त्यांना मारले आहे.

शशिकांतची पत्नी आणि नातेवाईकांचा ऑडिओ कॉल :

शशिकांतची पत्नी – हॅलो भाभी

दुसर्‍या बाजूने – हा

शशिकांतची पत्नी – वहिनी, माझ्या दरवाज्यावर दोन माणसे मेली आहेत, अंगणात माझ्या दारात एक माणूस मेला आहे. हे सर्व लोक पळून गेले आहेत, पोलिस आल्यावर काय म्हणावे ?

दुसर्‍या बाजूने – ते लोक कोण आहेत?

शशिकांत यांची पत्नी – वाहिनी , ते सर्व पोलिस आहेत, विकास भैयाने मारले आहे. या सर्व लोकांना मारले आहेत. पोलिसवाले आहेत

दुसर्‍या बाजूने – हा, सर्व नंबर डिलीट करून टाक.

शशिकांतची पत्नी: हा, सर्व मोबाईल स्विच ऑफ करून लपवित आहोत.

दुसर्‍या बाजूने – सर्व नंबर डिलीट करून टाक, घरातच बसून राहा आणि सांग मला काही माहित नाही.

शशिकांतची बायको – वाहिनी मला सांगा, ते विचारतील तुमचा माणूस कुठे गेला आहे, जर तो दिवसा कर्तव्यावर आला तर काय सांगू , वडीलही पळून गेले आहेत.

दुसर्‍या बाजूने – तर सांगून टाक कि त्यांची डबल ड्युटी होती.

शशिकांतची पत्नी: तर तेथून समजेलच .

दुसर्‍या बाजूने – सांग कि मला काय माहित, मला सांगितलेले नव्हते. तुम्ही सांगत आहात तेव्हा मला समजत आहे

शशिकांतची पत्नी – मला सांगा की, मी जर मोबाइल स्विच बंद केला तर मोबाईलचे लोकेशन कळणार नाही ना , त्यांनीही आपला मोबाईल इथेच सोडला आहे.

दुसर्‍या बाजूने – तू बसून रहा

शशिकांतची पत्नी: आम्ही स्विच ऑफ करत आहोत

दुसर्‍या बाजूने – तू हा नंबर आधी डिलीट कर, माझा आणि सोनूचा डिलीट कर, फोन असाच ठेव. स्विच ऑफ करु नको.

शशिकांतची पत्नी – ते म्हणतील की, तुमच्या अंगणात माणूस मारला गेला, तू पोलिसांना का बोलला नाही? आम्ही फोनच लपवतो. म्हणेल माझ्याकडे फोन नव्हता.

दुसर्‍या बाजूने – हा, हा हे ठीक राहील.

शशिकांतची पत्नी – वाहिनी आता काय होईल, आम्ही खूप अस्वस्थ आहोत.

दुसऱ्या बाजूला – काळजी करू नका, देव सर्व काही ठीक करेल, शांत रहा

शशिकांतची पत्नी – ठीक आहे.

दुसर्‍या बाजूने – संधी मिळाल्यास बाहेर जा

शशिकांतची बायको – आता रात्री यावेळी कुठे निघणार?