‘या’ कारणामुळं शिवसेनेनं देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपदाचा ‘राजीनामा’ मागितला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना भाजपवर सर्वच नेत्याकडून टीका होताना पहायला मिळतीय. शिवसेना आपल्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. संजय राऊत यांनी तर देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे त्यामुळे देवेंद्र फडवीस यांनी राजीनामा द्यावा. सत्ता स्थापनेवरून संजय राऊत यांनी वारंवार भाजपवर निशाणा साधला आहे.

जर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर हा राज्यातील जनतेचा अपमान असेल, जर भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार असेल तरच त्यांनी बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर यावे असा इशारा देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे.

काय आहे भाजप शिवसेनेतील वादाचे कारण
शिवसेनेने असा दावा केला आहे की, लोकसभा निवडणुकीवेळी गृहमंत्री अमित शहा यांनी आम्हाला शब्द दिला होता की विधासभा निवडणुकीत सम समान पदांचे वाटप केले जाईल. म्हणून आता शिवसेना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदासाठी असून बसली आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही असा कोणत्याही प्रकारचा शब्द दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे आणि याच कारणांवरून दोनीही पक्षामध्ये सत्ता स्थापनेबाबत तिढा निर्माण झालेला आहे.

कशी आहे सध्याची आकडेवारी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 105, शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 54, काँग्रेसच्या 44 जागा निवडून आलेल्या होत्या. युती मध्ये लढलेल्या भाजप सेनेचे ऐकून संख्याबळ 161 जागांचे आहे.

Visit : Policenama.com