अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये 12 जणांवर गोळीबार, एकाचा मृत्यू तर 11 जखमी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या मिनियापोलीस येथील पोलिसांनी सांगितले की, मुख्य शहरापासून लांब असलेल्या एका जिल्ह्याजवळ 12 लोकांवर गोळ्या घालण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून11 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या मिनियापोलिस पोलिसांनी सांगितले की मुख्य शहरापासून दूर असलेल्या जिल्ह्यात जवळजवळ लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले आहेत. गोळीबारीच्या घटेनेचे फेसबुकवर लाईव्ह करण्यात आले आहे.

या व्हिडीओत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे दिसत आहे. तर इतर व्हिडीओमध्ये लोक आरडा ओरडा करत आहेत. तर काही व्हडिओमध्ये खिडक्यांच्या काचा तुटलेल्या असून काही अंतरावर पोलिसांच्या अनेक गाड्या पार्क केल्याचे दिसत आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

11 गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मृत व्यक्तीचे नाव, वय आणि यामध्ये कोणाला अटक केली आहे याची माहिती दिलेली नाही. दरम्यान, या शहरातील लोक वर्ण द्वेषाविरोधात आंदोलन करत होते. पोलिसांच्या क्रौर्याने अश्वेत जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील इतर भागात अशाप्रकारची आंदोलने करण्यात येत आहेत.