काय सांगता ! होय, ‘लॉकडाऊन’मुळं दुकानं बंद झाली तर YouTube वर पाहून बनवली ‘अवैध’ दारू आणि नंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे केरळमध्ये ताडीसह सर्व दारुची दुकानं बंद आहेत. हेच कारण ठरलं की काही युवकाने स्वत: दारु तयार करण्याचा प्रयत्न केला. आबकरी विभागाने आता 7 तरुणांना ताब्यात घेतले आहे.

सुमेश जेम्स यांच्या नेतृत्वात आबकरी टीमने चार युवकांच्या एका समूहाला ताब्यात घेतले आहे. जेम्स म्हणाले, ते यू ट्यूबवर दारु तयार करण्याचं शिकले. त्यांच्याकडून जवळपास 200 लीटर कच्चा माल आणि उपकरण जप्त करण्यात आली आहेत. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या अनेक भागात अशीच छापेमारी करण्यात आली आणि इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 80 लीटर कच्चा माल जप्त करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी आबकरी अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाच्या एका माजी अधिकाऱ्याला देखील ताब्यात घेतले होते. तो दारु तयार करत होता आणि त्याच्याकडून 500 बाटल्याशिवाय खोटे होलोग्राम आणि स्टीकर जप्त करण्यात आले होते. जे दारुच्या बाटल्यांवर लावण्यात येत होते.

एका अध्ययनात लक्षात आले की राज्यातील 3.34 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 32.9 लाख लोक दारु सेवन करतात. ज्यातील 29.3 लाख पुरुष आणि 3.1 लाख महिला आहेत. तर जवळपास 5 लाख लोक दारुचे सेवन करतात. यातील जवळपास 83,851 लोक जे दारुचे अत्यंत व्यसनी आहेत ज्यात 1,043 महिला आहेत.