Coronavirus : देशात ‘कोरोना’मुळं आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, जाणून घ्या त्यांच्या आरोग्याची ‘पार्श्वभुमी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात कोविड – 19 च्या संक्रमणामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे आणि सर्वांच्या हेल्थ हिस्ट्रीचा विचार केला तर ते कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. यामुळे त्यांची प्रतिकार क्षमता कमी झाली होती.

1. कर्नाटकात 76 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू –
देशातील पहिला कोरोनाचा बळी कर्नाटकात 76 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा झालाय कलबुर्गीचा राहणारा हा व्यक्ती बराच आजारी होता. त्यांना रक्तदाब, मधुमेह, अस्थमाचा आणि अपेंडिक्सची समस्या होती. डॉक्टरांच्या मते पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले की कोरोना त्या व्यक्तीला लवकर होतो जे तंदुरुस्त नसतात.

2. दिल्लीत 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू –
राजधानी दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयात कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला. ही महिला 69 वर्षी होती, आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, मृतकाला एकापेक्षा जास्त आजार होते.

3. महाराष्ट्रातील 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
भारतातील तिसरा मृत्यू मुंबई कस्तुरबा रुग्णालयात 64 वर्षीय व्यक्तीचा झाला. या व्यक्तीने दुबईचा प्रवास केला होता. या व्यक्तीला कोरोनाशिवाय इतर देखील आजार होते. काही वृत्तानुसार या व्यक्तीला रक्तदाब, निमोनिया आणि हृदयाचे आजार होते.

4. पंजाबमध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
19 मार्चला देशात 70 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. हा भारतातील 4 था मृत्यू होता. 7 मार्चला ही व्यक्ती दिल्लीहून पंजाबला आली होती त्यापूर्वी ती जर्मनीहून इटलीहून भारतात आली होती. या व्यक्तीला मधुमेह आणि हायपरटेंशनचा त्रास होता.

5. बिहारमध्ये 40 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचा मृत्यू –
आतापर्यंत कोरोनामुळे 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता पर्यंत बिहारमध्ये 40 पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृतक 38 वर्षीय होता. माहितीनुसार चुरम्बामध्ये राहणारा हा व्यक्ती कतारहून आला होता.

6. महाराष्ट्रात 56 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
19 मार्चला मुंबईच्या रुग्णालयात हा व्यक्ती दाखल झाला होता. या व्यक्तीला मधुमेह आणि हृदयाची समस्या होती. हा व्यक्ती परदेशात जाऊन आल्याची कोणतीही माहिती नाही. अधिकाऱ्यांच्या मते 21 मार्चला हा व्यक्ती पॉझिटिव्ह आला होता.

7. गुजरातमध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
22 मार्चला गुजरातमध्ये 67 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीने दिल्ली आणि जयपूरचा प्रवास केला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले 17 मार्चला किडनी आणि अस्थमामुळे समस्या जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानी परदेश प्रवास केला नव्हता. अधिकाऱ्यांनी सांगितले की 21 मार्चला या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

8. बंगालमध्ये 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
कोलकत्याच्या साल्ट लेक यूनिटमध्ये 57 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चाचणीत ही व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळली होती. या व्यक्तीला सोमवारी ईसीएमओवर दोनदा ठेवण्यात आले होते परंतु त्याचा उपयोग झाला नाही.

9. हिमाचलमध्ये 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
हिमालचमध्ये कोरोनाग्रस्त 68 वर्षीय एका तिबेती नागरिकाचा सोमवारी (23 मार्च) कांगडाच्या टांडा स्थित वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

10. महाराष्ट्रात परदेशी नागरिकाचा मृत्यू –
महाराष्ट्रात 65 वर्षीय कोरोनाग्रस्त परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला. हा व्यक्ती युएईचा असल्याचे समजले, त्याच्यावर मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होता.

11. तमिळनाडूमध्ये 54 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू –
तमिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे.