विमानतळावर दुसऱ्यांदा ‘हरवलं’ सोनम कपूरचं ‘सामान’, ब्रिटिश एअरवेजवर भडकलेल्या अभिनेत्रीनं सर्वांसमोरच ‘खरडपट्टी’ केली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलीवुड अभिनेत्री सोनम कपूरचे एक ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सोनमने ब्रिटिश एयरवेज बाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर एका महिण्यात दोनदा माझे सामान गहाळ केल्याचा आरोप सोनमने केला आहे. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे. आता परत मी येथून प्रवास करणार नसल्याचे देखील सोनमने सांगितले. यानंतर लगेच ब्रिटिश एयर वेजने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

सोनमने ट्विटरवर लिहिले आहे की, माझे सामान गहाळ करण्याची ही दुसरी वेळ आहे आणि यातून मी चांगलाच धडा घेतला आहे. आतापासून मी कधीच ब्रिटिश एअरवेजने प्रवास करणार नाही.

सोनमच्या या ट्विटला वाचल्यानंतर एअरलाईन कंपनीने उत्तर देत सांगितले की, तुमचे सामान मिळण्यासाठी तुम्हाला उशीर लागला यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो. परंतु ज्यावेळी तुम्ही विमानतळावर माहिती दिली होती त्यावेळी तुम्हाला एखादा ट्रॅकिंग कोड देण्यात आला होता का ? असा सवाल विचारण्यात आला आहे.

ब्रिटिश एयरवेजच्या ट्विटला रिट्विट करताना सोनम म्हणते, हे सर्व करण्यात आले आहे मात्र हे खूप असुविधाजनक आहे. तुम्ही यावर लक्ष दिले पाहिजे कारण यामुळे तुमची खराब सर्विस दिसून येते.

 

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/