कानपूरमध्ये आणखी एक ‘एन्काउंटर’, यावेळी गाडी पलटली नाही, STF नं 3 मिनिटांत ‘विकास’ला मारलं ठार

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – बिकेरू येथील आठ पोलिसांच्या हत्येचा मुख्य आरोपी विकास दुबे याच्या एन्काउंटरचे शनिवारी सचेंडीमध्ये महामार्गावर री-कंस्ट्रक्शन (नाट्य रूपांतरण) झाले. ज्या दिवशी विकासला ढेर करण्यात आले होते, त्या दिवशी अपघातात कार पलटी झाली होती. शनिवारी गाडी पलटवण्यात तर आली नाही परंतु बाकी त्याच सीनचे रूपांतर करण्यात आले. गाडीच्या मागील दरवाजावरून विकास शेजारी बसलेले इंस्पेक्टर रमाकांत पचौरी यांची पिस्तूल हिसकावून पळाला आणि एसटीएफसमवेत पोलिस पथकाने केवळ तीन मिनिटाच्या चकमकीच्या दरम्यान त्याच्या छातीवर दोन आणि कंबरेवर एक गोळी झाडली आणि त्यास ढेर केले. हा संपूर्ण सीन री-क्रिएट करण्यात आला आणि फॉरेन्सिक टीमने समजून घेतला.

ट्रान्झिट रिमांडवर आणताना 10 जुलैला सकाळी विकास दुबे हा चकमकीत ठार झाला. मानवाधिकार आयोगाच्या आदेशावरून घटनेचे सत्य जाणून घेण्यासाठी लखनऊ येथून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची टीम सचेंडी येथे घटनास्थळी पोहोचली. यानंतर, पथकात उपस्थित एसटीएफ आणि पोलिस कर्मचार्‍यांनी संपूर्ण क्राइम सीनचे री-कंस्ट्रक्शन केले. ज्यात जिथून गाडी पलटी झाली त्या ठिकाणाहून सुमारे शंभर मीटर अंतरावर विकासला गावात जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर ठार करण्यात आले. विकासला एसटीएफच्या सीओने कसा वेढा घातला आणि चकमकीच्या दरम्यान विकासने त्यांच्या छातीत गोळी कशी मारली, परंतु बुलेटप्रुफ जॅकेट असल्याने ते बचावले. इतर सहकाऱ्यांनी मोर्चा सांभाळत विकासला ठार केले हे सर्व यातून समजून घेण्यात आले.

फॉरेन्सिक तज्ञाने बारकाईने केला तपास

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे बॅलिस्टिक प्रभारी डॉ. एके श्रीवास्तव यांनी चार सदस्यांच्या टीमसह एक-एक गोष्टीची पाहणी केली. एफआयआरनुसार हा पूर्ण घटनाक्रम कसा होता हे पाहण्यात आले. रमाकांत पचौरी यांच्यासह अजून किती जखमी झाले आणि कशा पद्धतीने झाले ते पाहिले, हे सर्व शक्य आहे का हे देखील पाहण्यात आले. एसटीएफचे सीओ तेज बहादुर सिंह आणि त्यांची टीम सचेंडी एसओ अतुल सिंह, एन्काउंटरचा तपास करीत असलेले गोविंद नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी अनुराग उपस्थित होते.

एसटीएफच्या पुष्पेंद्र यांनी विकासची भूमिका निभावली

विकास दुबेची भूमिका एसटीएफचे शिपाई पुष्पेंद्र यांनी निभावली. पुष्पेंद्रने गुन्हेगारीचे सीन जिवंतपणे सादर केले. चकमकीच्या वेळी विकासने फायर केलेले कियॉक्स सापडले परंतु शेत आणि कच्चा रस्ता, गवत आणि पेंढा यामुळे एसटीएफने झाडलेल्या गोळ्यांचे कियॉक्स सापडू शकले नाहीत.